Good News : न्यूझीलंडने Covaxin आणि Covishield ला दिली मान्यता

आत्तापर्यंत ९६ देशांनी Covaxin आणि Covishield ला मान्यता दिली आहे.

indian corona vaccine india covaxin and covishield are recognized by 110 countries
Indian Corona Vaccine : भारताच्या Covaxin आणि Covishield ला ११० देशांत परवानगी

परदेशात प्रवास करु इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण बुधवारी न्यूझीलंडने भारताच्या कोरोना विरोधी कोवॅक्सिन (Covaxin) आणि (Covishield ) लसीला मान्यता दिली आहे. न्यूझीलंडने या दोन्ही लसींचा समावेश त्यांच्या आठ मान्यताप्राप्त लसींच्या यादीत केला आहे. त्यामुळे भारतातून न्यूझीलंडला प्रवास करु इच्छिणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. न्यूझीलंडमधील भारताचे उच्चायुक्त मुक्तेश परदेशी यांनी याबाबतची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “एक सकारात्मक निर्णय, न्यूझीलंडने ८ मान्यता प्राप्त लसींच्या यादीत भारताच्या Covishield आणि Covaxin चा समावेश केला आहे. मात्र प्रवास बंदी उठवण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय.”

काही दिवसांपूर्वीच कोवॅक्सिन लसीने जागतिक आरोग्य संघटनेच्या लसींच्या आपत्कालीन वापराच्या यादीत स्थान मिळाले आहे. भारतातील या स्वदेशी कोवॅक्सिनचा कार्यक्षम दर ७७.८ टक्के असल्याचे आढळून आले आहे. भारतातील Covishield आणि Covaxin दोन्ही लसींना अनेक देशांनी मंजुरी दिली आहे. आतापर्यंत जगातील ९६ देशांनी या दोन्ही लसींना मान्यता दिली आहे. या ९६ देशांमध्ये कॅनडा, यूएसए, ऑस्ट्रेलिया, स्पेन, यूके, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, रशिया आणि स्वित्झर्लंड यांचा समावेश आहे.

भारतासह सोमवारी यूएस, यूके, यूएई, कतार, फ्रान्स आणि जर्मनीसह ९९ देशांतील पूर्णपणे लसीकरण झालेल्या प्रवाशांना क्वारंटाईनमधून मुक्तता दिली आहे. ९९ देशांतील प्रवाशांना क्वारंटाइनमधून सूट दिली असली तरी, त्यांना काही नियमांचे पालन करावे लागेल जे सर्व प्रवाशांसाठी बंधनकारक असतील.

भारतात आत्तापर्यंत १०९ कोटींहून अधिक लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर या वर्षाच्या अखेरीस सर्व १०८ कोटी प्रौढांचे पूर्णपणे लसीकरण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सध्या भारतात भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोव्हिशील्ड या दोन प्रमुख लस दिल्या जात आहेत, आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ११३ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.