Good News : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, महाराष्ट्रात इंधनाच्या दरात मोठी घट झाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Good News: Petrol-diesel has become cheaper in Maharashtra

शनिवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. आज WTI क्रूड $ 2.15 किंवा 2.74 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल $ 76.34 वर सध्या व्यापार करत आहे. दुसरीकडे, ब्रेंट क्रूड देखील $ 2.14 (2.51%) ने घसरून $ 83 वर आले आहे. देशातील तेल कंपन्यांकडून दररोज सकाळप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केल्याचे पाहाला मिळत आहे. दरम्यान, अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल झाल्याचे शनिवारी सकाळी दिसून आले आहे.

आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्रात पेट्रोलचा दर 1.02 रुपयांनी कमी झाला असून 106.15 रुपये प्रतिलिटर भावाने पेट्रोल मिळणार आहे. तर डिझेल 99 पैशांनी घसरून 92.67 रुपये प्रतिलिटर दराने सध्या विकले जात आहे. परंतु अनेक राज्यांमध्ये इंधन महाग झाले आहे. पंजाबमध्ये पेट्रोल 22 पैशांनी तर डिझेल 23 पैशांनी महागलेआहे. उत्तर प्रदेशातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 22 पैशांची वाढ झाली आहे. तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटकातही इंधनाचे दर वाढले आहेत.

चारही महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर भावाने मिळणार आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर भावाने तर कोलकाता येथे पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने मिळणार आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 942 रुपये प्रति लिटर दराने मिळेल.

‘या’ शहरांमध्ये नवीन दराने मिळेल इंधन
नोएडामध्ये पेट्रोल 96.79 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर झाले आहे. गाझियाबादमध्ये 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर झाले आहे. लखनऊमध्ये पेट्रोल 96.47 रुपये आणि डिझेल 89.66 रुपये प्रति लिटर झाले आहे. तर पाटणामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर आणि पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर झाले आहे.

दररोज सकाळी 6 वाजता जाहीर होतात नवे दर
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता माहितीच्या आधारे बदलले जातात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल अधिक दरात खरेदी करावे लागते.

अशा प्रकारे जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे भाव
पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांच्या शहराचा कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात. तसेच BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून त्या-त्या दिवसाच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत जाणून घेऊ शकतात.

हेही वाचा – पाकिस्तानच्या कराची पोलीस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला; स्फोटात 6 जणांचा मृत्यू, 12 जखमी