घरदेश-विदेशकेंद्रीय सरकारी नोकरदारांना Good News! ७ व्या आयोगाच्या वेतन निश्चितीची डेडलाइन वाढली

केंद्रीय सरकारी नोकरदारांना Good News! ७ व्या आयोगाच्या वेतन निश्चितीची डेडलाइन वाढली

Subscribe

केंद्रीय सरकारी नोकरदारांना सरकारने एक गुडन्यूज दिली आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्च‍ितीच्या डेडलाइनमध्ये वाढ करून ती डेडलाइन तीन महिने पुढे ढकलली आहे. यापूर्वी १५ एप्रिलला वेतन निश्चिती होणार होती. मात्र आता ती १ जुलै २०२१ ला महागाई भत्ता पूर्ववत झाल्यानंतर वेतनवाढीचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याचे नुकतेच समोर आले आहे.

यानुसार, महागाई भत्ता पुर्ववत झाल्यावर वेतनवाढीचा लाभ केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार यंत्रणेनुसार वेतनवाढ कोणत्या तारखेनुसार लागू करायची आहे, याचा निर्णय घेता येणार आहे. अनेकांना कोरोना काळात कामाच्या ताणामुळे पर्याय निवडता आला नव्हता. मात्र, आता त्यांना ही संधी मिळणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, यापूर्वी कर्मचाऱ्यांना १०, २० आण‍ि ३० वर्षांच्या सेवेनंतर निश्च‍ित पदोन्नती मिळत होती. परंतु ती आता कामगिरीच्या आधारे पदोन्नती किंवा वेतनवाढ होणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना आता ती तारीख ठरवता येणार आहे. तसेच, कामगार खात्याकडून वेतन निश्चितीबाबत नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ते बदल म्हणजे पदोन्नतीच्या तारखेपासून किंवा वेतनवाढीच्या तारखेनुसार वेतन निश्चितीचा पर्याय देण्यात आला आहे. यासह पदोन्नतीच्या तारखेपासून वेतननिश्च‍िती निवडण्याचा पर्यायही कर्मचाऱ्यांना आहे.

लाखो सरकारी कर्मचारी आता सातव्या वेतन आयोगाच्या घोषणेची वाट पाहत आहेत. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ होणार आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये तयार केलेल्या आयोगाच्या शिफारसी मान्य करण्यात आल्या आहेत. या आयोगाची स्थापना २०१४ मध्ये करण्यात आली होती. सरकारने २० जून २०१६ रोजीच सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी मान्य केल्या होत्या. ज्या १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आल्या होत्या. या शिफारसींमध्ये नवीन पे- मॅट्रिक्सची घोषणा करण्यात आली. याअंतर्गत ग्रेड पे व्यवस्थेला यात सामील करण्यात आले आहे.

- Advertisement -

पे- मॅट्रिक्स म्हणजे काय?

सातव्या वेतन आयोगाने नवीन बदल लक्षात घेऊन पे-मॅट्रिक्सची घोषणा केली आहे. याअंतर्गत ग्रेड-पे ला यात सामाविष्ठ करण्यात आले आहे. या पे-मॅट्रिक्स च्या मदतीने नव्याने नौकरीची सुरूवात करणारे कर्मचारी संपूर्ण करिअर दरम्य़ान होणाऱ्य़ा पगारवाढीचा आढावा घेऊन ती समजावून घेऊ शकतील. नागरी कर्मचारी, सुरक्षा दल आणि मिल्ट्री नर्सिंग सर्व्हिस (MNS) साठी वेगवेगळे पे-मॅट्रिक्स तयार करण्यात आले आहे. आता या मॅट्रिक्सनुसार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारीत वाढ होणार आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -