मुंबई : येत्या दिवसांत ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल 70 डॉलरपर्यंत पोचण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीम म्हणजेच नवीन वर्षाच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 5 रुपयांपर्यंत घसरण होऊ शकते, अशी माहिती तज्ज्ञांनी दिलेली आहे.
आंतरराष्ट्रायी बाजारात गुरुवारी कच्च्या तेलांच्या किमतीत सुमारे 5 टक्क्यांनी घसरण झाली आहे. अमेरिके इन्व्हेंटरीमध्ये वाढ आणि मागणीत घट झाल्याचे कारण आहे. पण हे सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बाब आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती घट झाल्यानंतर यांचा फायदा सर्वसामान्यांनी देशात कधी मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. देशात नवीन वर्षात सर्वसामान्यांना स्वस्त पेट्रोल मिळू शकते. जानेवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 ते 5 रुपयांची घसरण होण्याची शक्यता आहे. यासाठी आगामी काळातील ओपॅकची बैठक ही खूप महत्त्वाची मानली जाते. ज्यामध्ये कच्चा तेलाच्या उत्पादनात कपात झाल्यामुळे मार्च 2024 पर्यंत वाढली जाऊ शकते. यामुळे कच्चा तेलाच्या किमतीत थोडी फार वाढ होऊ शकते.
डॉलरच्या निर्देशांकात घसरण होऊ शकते. यामुळे कच्चा तेलाच्या किमतीत घसरण होत असून रुपयाच्या घसरणीबाबत सर्वात मोठी चिंता वाटत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाने घसरण सुरू आहे. कच्चा तेलाच्या आयातीत डॉलरच्या तुलनेत रुपयांची वाढ आणि घसरण या दोन्ही गोष्टी महत्त्वाची भूमिका बजावतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचा – मराठा समाज मागास आहे का? मागासवर्ग आयोगाची आज बैठक; संभाजीराजेही घेणार भेट
तेलाच्या किमतीत घसरण
तेलाच्या किंमती गुरुवारी जवळपास 5 टक्क्यांनी घसरण ही मागील चार महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर आले आहेत. ब्रेंट क्रूड तेल 3.76 डॉलर किंवा 4.6 टक्क्यांनी घसरुन प्रति बॅरल 77.42 डॉलरवर बंद झाले आहे. यात अमेरिका आणि आशियातील कमकुवत आकडेवारीनंतर जागतिक तेलाच्या मागणीची चिंता सांगतिली जाते.
गेल्या सात महिन्यात प्रथमच ऑक्टोबरमध्ये यूएसमध्ये किरकोळ कच्चा तेलाच्या विक्रीत घट झाली आहे. या काळात मोटार वाहांच्या विक्रीत देखील मोठ्याप्रमाणत घट झाली. त्यामुळे चौथ्या तिमाहीच्या सुरुवातीस मंद मागणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदर वाढीची अपेक्षा आणखी मजबूत झाली आहे.
हेही वाचा – Mumbai News: वांद्रे येथे गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; आठ जण जखमी
ओके बैठकीकडे लक्ष लागले
एचडीएफसी सिक्युरिटीचे कमोडिटी करन्सी हेड अनुज गुप्ता म्हणाले, “तेल उत्पादनातील कपात मार्च तिमाहीपर्यंत वाढविली जाऊ शकते. त्यामुळे कच्चा तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या असून वाढीचा तितकासा परिणाम होणार नाही. रशिया आणि सौदी अरेबिया या दोन्ही देशांकडून उत्पादनात कपात केली जात आहे. यामुळे कच्चा तेलाची किमत प्रति बॅरल किमान 80 डॉलरवर गेली आहे.
हेही वाचा – संजय राऊत घेणार राष्ट्रपतींची भेट; ‘या’ मुद्यांवर करणार चर्चा
रुपयाची घसरण
केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अज केडिय म्हणतात, डॉलरच्या निर्देशांकात घसरण होत आहे. सध्या डॉलर निर्देशांक 104च्या पातळीवर आला असून येत्या आठवड्यात 102च्या पातळीवर जाऊ शकतात. यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण ही चिंतेची बाब आहे. देशात 80 टक्क्यांहून अधिक कच्चा तेलाची आयात करतो.