Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश दिलासादायक: कोरोनाबधितांसाठी पुढील आठवड्यात बाजारपेठेत दाखल होणार 2 डीजी औषध

दिलासादायक: कोरोनाबधितांसाठी पुढील आठवड्यात बाजारपेठेत दाखल होणार 2 डीजी औषध

, कोरोना व्हायरसमुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे. हे औषध कोरोना संक्रमित कोशिकांवर काम करते तसेच कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल होण्यापासून रोखण्यास मदत करू शकते.

Related Story

- Advertisement -

जगभरामध्ये कोरोना व्हायरसचा कहर सुरू असताना रुग्णासंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एकीकडे कोरोनाबधितांचा आकडा लाखोंच्या घरात पोहोचला असून आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. तर दुसरीकडे आपुर्‍या सोयी सुविधे अभावी अनेक रुग्ण दगावत आहेत. सध्या देशभरामध्ये लसीकरणाला जोमाने सुरुवात झाली असून आता बाजारात स्पुटनिक- वी बाजारात पुढील आठवड्या पासून उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत माहिती देण्यात आली आहे की, 10 हजार 2 डिजी कोरोना लसीची पहिली बॅच पुढील आठवड्यात बाजारात दाखल होणार आहे. तसेच लसीचा डोज घेतल्यास कोरोना व्हायरस पासून रिकव्हरी होण्यास तसेच कोरोना रुग्णाला ऑक्सीजवर अवलंबून न राहण्यास मदत करते. डीआरडीओच्या निर्मात्यांनी माहिती दिली आहे की, औषध निर्मिती संस्था भविष्यात औषधांच्या उत्पादनात वाढ करणार आहे. तसेच या औषधनिर्मिती मध्ये डॉ. सुधीर चांदना, डॉ. अनंत नारायण भट्ट और डॉ. अनिल मिश्रा यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

2-डीजी (2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज)
हे औषध एका पॅकेट मध्ये पाऊडर स्वरुपात आहे. तसेच याचे पाण्यासोबत एकत्र करून सेवन करण्यात येते. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO)औषधाबद्दल सांगितले आहे की, कोरोना व्हायरसमुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे. हे औषध कोरोना संक्रमित कोशिकांवर काम करते तसेच कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल होण्यापासून रोखण्यास मदत करू शकते.


- Advertisement -

हे हि वाचा – Mucormycosis: महाराष्ट्रात काळ्या बुरशीने घेतले ५२ बळी, इंजेक्शनचा मोठा तुटवडा

- Advertisement -