Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी सुंदर पिचाई यांच्या चेन्नईतील घराची विक्री; कागदपत्रांवर सही करताना वडील भावूक

सुंदर पिचाई यांच्या चेन्नईतील घराची विक्री; कागदपत्रांवर सही करताना वडील भावूक

Subscribe

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या चेन्नईतील वडिलोपार्जित घराची विक्री करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. चेन्नईतील अशोक नगर येथे सुंदर पिचाई यांचे घर आहे.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या चेन्नईतील वडिलोपार्जित घराची विक्री करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. चेन्नईतील अशोक नगर येथे सुंदर पिचाई यांचे घर आहे. सुंदर पिचाई यांचा जन्म या घरात स्टेनोग्राफर लक्ष्मी आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर रघुनाथ पिचाई यांच्या घरी झाला आणि त्यांचे बालपण येथेच गेले. (google ceo sundar pichai chennai home sold to tamil famous actor C Manikandan)

सुंदर पिचाई यांचे हे घर तमिळ अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शक सी मणिकंदन यांनी विकत घेतले आहे. हे घराच्या विक्रीच किंमत अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, ‘हे घर विक्रीनंतर या घराची कागदपत्रे सोपवताना सुंदर पिचाई यांचे वडील खूप भावूक झाले, कारण ही त्यांची पहिली मालमत्ता होती’, असे अभिनेते सी मणिकंदन यांनी सांगितले. ‘सुंदर पिचाई हे आपल्या देशाची शान आहेत आणि ते जिथे राहत होते ते घर विकत घेणे ही माझ्या आयुष्यातील अभिमानास्पद कामगिरी आहे’, असेही सी मणिकंदन यांनी सांगितले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, 4 महिन्यांपूर्वीच सुंदर पिचाई यांच्या घरासाठीचा करार सुरू झाला असून 2023मध्ये हा व्यवहार पूर्ण झाला आहे. पिचाई यांचे वडील बराच काळ अमेरिकेत असल्यामुळे या कराराला वेळ लागत होता.

“गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या पालकांच्या नम्रतेची मला खात्री पटली. सर्वात मोठी बाब म्हणजे घराच्या कागदपत्रांच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेदरम्यान ते रजिस्ट्रार कार्यालयात तासनतास थांबले होते. सौदा करण्यापूर्वी त्यांनी घराशी संबंधित सर्व कर भरले. एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाचे वडील असूनही त्यांनी आपल्या मुलाच्या नावाचा वापर करून हस्तांतरण प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला नाही”, असेही सी मणिकंदन यांनी सांगितले.


- Advertisement -

हेही वाचा – Pakistan Economic Crisis: अमेरिका आणि चीन पाकिस्तानची आण्विक शस्त्र जप्त करणार?

- Advertisment -