घरताज्या घडामोडीDr Kamal Ranadive : ब्रेस्ट कॅन्सरचा अनुवांशिकतेशी संबंध पहिल्यांदा सांगणाऱ्या डॉक्टरचा गुगल...

Dr Kamal Ranadive : ब्रेस्ट कॅन्सरचा अनुवांशिकतेशी संबंध पहिल्यांदा सांगणाऱ्या डॉक्टरचा गुगल डूडलने सन्मान

Subscribe

भारतीय सेल बायोलॉजिस्ट डॉ कमल रणदिवे यांच्या १०४ व्या जयंतीच्या निमित्ताने Google ने आपलं खास असे doodle सादर केले आहे. कॅन्सरसारख्या घातक आणि आजारावर आणि व्हायरसवर संशोधनासाठी डॉ कमल रणदिवे यांचे संशोधन महत्वाचे ठरले होते. कॅन्सरमध्ये संशोधन करताना ब्रेस्ट कॅन्सर आणि अनुवांशिकतेचा एकमेकांशी संबंध असल्याच्या संशोधन करणारी पहिली व्यक्ती म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. भारत सरकारच्या चिकित्सा विज्ञानाच्या क्षेत्रात त्यांना १९८२ मध्ये पद्म भूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

आजच्या गुगल डूडलमध्ये एक महिला लॅबमध्ये संशोधन करताना दिसत आहे. ही लॅबमध्ये दिसणारी महिला म्हणजे डॉक्टर कमल रणदिवे आहेत. कमल रणदिवे यांचा जन्म हा ८ नोव्हेंबर १९१७ साली झाला होता. महाराष्ट्रातील पुणे जिल्हा हे त्यांचे जन्मस्थान. त्यांच्या वडिलांनीच वैद्यकीय शिक्षणासाठी सुरूवातीच्या काळात प्रेरणा दिली. पण त्यांची विशेष आवड ही जीवशास्त्रात अधिक होती. १९४९ मध्ये त्यांनी भारतीय कॅन्सर संशोधन केंद्रात संशोधकाच्या जबाबदारीत काम केले.सेल सायन्स, सेलच्या अभ्यासात त्यांनी पीएचडीही मिळवली. कमल रणदिवे यांच्या आपल्या उमेदीच्या अशा सुरूवातीच्या काळात कॅन्सरवर मोठ्या प्रमाणात संशोधन केले. पण त्यांची ओळख निर्माण झाली ती म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आणि अनुवांशिकतेचा परस्पर संबंध असलेल्या संशोधनापासूनच. अशा पद्धतीचे संशोधन करणाऱ्या त्या पहिल्याच होत्या. ब्रेस्ट कॅन्सर आणि अनुवांशिकतेच्या संशोधनावर त्यानंतरच्या काळातील संशोधकांनीही खातरजमा करत हे संशोधन योग्य असल्याचे स्पष्टोक्ती दिली होती. डॉ रणदिवे यांना बाल्टीमोर, मॅरिलॅंड, यूएसए, जॉन्स हॉपकिन्स इन्स्टिट्यूट याठिकाणी फेलोशिप मिळाली होती. याठिकाणी फेलोशिप केल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली आणि देशातील पहिली प्रयोगशाळा निर्माण केली.

- Advertisement -

कमल रणदिवे या भारतीय महिला वैज्ञानिक संघाच्या प्रमुख संस्थापिकाही होत्या. डॉ कमल रणदिवे यांनी चिकित्सा विज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी भारत सरकारकडून पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ११ एप्रिल २००१ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी डॉ कमल रणदिवे यांचे निधन झाले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -