घरट्रेंडिंगकामिनी रॉय: भारतातील पहिली पदवीधर महिला; Googleने साकारले Doodle

कामिनी रॉय: भारतातील पहिली पदवीधर महिला; Googleने साकारले Doodle

Subscribe

आज त्यांची १५५ वी जयंती गुगलने डूडल साकारात केली साजरी

गुगलने आज आपले डूडल बंगाली कवयित्री, समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ कामिनी रॉय यांना समर्पित केले आहे. १२ ऑक्टोबर १८६४ रोजी बांग्लादेशच्या एका जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला होता. आज त्यांची १५५ वी जयंती गुगलने डूडल साकारात साजरी केली आहे. कामिनी रॉय भारताची पहिली महिला आहे ज्यांनी ब्रिटिश भारतात पहिल्यांदा पदवीचे शिक्षण घेतले होते. कामिनी रॉय एक कवयित्री जरी असल्या तरी त्यांनी समाजसेवेची मोठी आवड होती.

- Advertisement -

शिक्षणास प्राधान्य देणाऱ्या कामिनी रॉय

आझाद ख्याल कामिनी रॉय नेहमीच लहानपणापासूनच शिक्षणाला महत्व देत होत्या. कामिनीने १८८६ मध्ये कोलकाता विद्यापीठातील बेथुन महाविद्यालयातून संस्कृत ऑनर्ससह पदवी प्राप्त केली. त्यामुळे त्या काळात पदवी मिळविणारी ती पहिली महिला होती.

ब्रिटिश भारतातील पहिली पदवीधर महिला

पदवीनंतर कामिनी रॉय यांना त्याच विद्यापीठात शिकवण्याची संधी मिळाली. महिलांच्या हक्कांबद्दल कामिनी रॉय यांनी कविता लिहिण्यास सुरूवात केली. महिलांच्या हक्कांशी संबंधित असणाऱ्या कवितांच्या माध्यमातून त्यांची ओळख वाढली. त्यांचा सहकारी अबला बोसवर त्या खूप प्रभावित झाल्या होत्या त्यांच्या प्रेरणेने कामिनी रॉय यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. समाज सेवेबरोबर कामिनी रॉय यांनी स्वातंत्र्य चळवळीतही भाग घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -