घरदेश-विदेशट्रिपल डब्ल्यूला ३० वर्ष पूर्ण; गुगलचे खास डुडल

ट्रिपल डब्ल्यूला ३० वर्ष पूर्ण; गुगलचे खास डुडल

Subscribe

World Wide Web (www) ला आज ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने गुगलने खास डुडल तयार केले आहे.

गुगलवर सातत्याने बदलणारे खास डुडल प्रत्येक नेटकऱ्यांच्या आकर्षणाचा बिंदू ठरत आहे. आज गुगलने World Wide Web (www) च्या ३० व्या वर्षानिमित्त खास असे गुगल डुडल तयार केले आहे. गुगलवर कोणतीही गोष्ट शोधण्यासाठी वेबसाइटच्या आधी WWW टाकावे लागते. त्याशिवाय कोणतीही वेबसाइट सर्च होत नाही. अशा या ट्रिपल डब्ल्यूला आज ३० वर्ष पूर्ण झाली आहेत.

यांनी लावला ट्रिपल डब्ल्यूचा शोध

World Wide Web (www) सुरुवातीला देण्यात येते आणि त्यानंतरच ही वेबसाईट तयार होते. ज्यात www हे जोडूनच वेबसाईट बनवली जाते. World Wide Web (www) याचा शोध वैज्ञानिक टीम बर्नर ली यांनी लावला आहे. त्यामुळे गुगलने डुडल बनवताना टीम बर्नर ली यांच्या योगदानाचीही आठवण केली आहे.

- Advertisement -

टीम बर्नर ली यांच्याविषयी थोडक्यात

जगाला इंटरनेटची भेट देणारे टीम बर्नर ली यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. क्विंस कॉलेज आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठात त्यांनी १९७६ साली फजिक्समध्ये आपल्या पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी १९८९ साली सर्वात आधी इंटरनेट आणि वर्ल्ड वाइड वेब तयार केले. सर्नने वर्ल्ड वाइड वेबला आपल्या अधिकारात ठेवले होते. परंतु, १९९२ साली ते सार्वजनिक करण्यात आले. तर १९९३ साली संपूर्ण जगाला त्याचे अॅक्सेस देण्यात आले आहेत.


वाचा – पाहा: ‘गुगल’ची खास इंडियन डुडल्स!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -