घरट्रेंडिंगगुगलसाठी बनवा 'डुडल' आणि जिंका ५ लाख

गुगलसाठी बनवा ‘डुडल’ आणि जिंका ५ लाख

Subscribe

गुगलकडून डुडलसाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. देशभरातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार असून गुगलने डुडलसाठी गुगलच्या होम पेजवर आवाहन केले आहे

गुगलवर सतत बदलणारे डुडल प्रत्येक नेटकऱ्यांच्या आकर्षणाचा बिंदू आहे. आता तुम्ही देखील तुम्हाला हे डुडल बनवू शकता आणि ५ लाख रुपये जिंकू शकता. गुगलकडून डुडलसाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. देशभरातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार असून गुगलने डुडलसाठी गुगलच्या होम पेजवर आवाहन केले आहे. ६ ऑक्टोबरपर्यंत हे तुम्ही तयार केलेले डुडल तुम्हाला पाठवायचे आहे. या स्पर्धेसंदर्भातील अधिक माहिती गुगलने दिलीच आहे.

कसे व्हाल सहभागी?

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला एक प्रवेश अर्ज भरावा लागणार आहे. गुगलच्या होम पेजवर गेल्यानंतर तुम्हाला या स्पर्धेसंदर्भातील लिंक दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर या स्पर्धेसंदर्भातील सगळी माहिती दिली आहे. ही स्पर्धा शालेय मुलांसाठी असून इयत्तांप्रमाणे गट करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश अर्ज भरणे आवश्यक आहे. या संदर्भातील अधिक माहिती तुम्हाला या  https://doodles.google.co.in/d4g/how-it-works.html लिंकवर मिळणार आहे.

- Advertisement -
google_desktop
इथे मिळेल तुम्हाला स्पर्धेची माहिती

कसा भराल हा प्रवेश अर्ज?

हा प्रवेश अर्ज डाऊनलोड करुन त्यात सगळी माहिती भरुन त्याची png किंवा jpg फॉर्मेटमध्ये पाठवायची आहे. याशिवाय पोस्टाने देखील हा प्रवेश अर्ज स्विकारला जाणार आहे. या अर्जासोबत तुम्हाला हाय रेझल्युशन तुमचे डुडल पाठवायचे आहे. शाळादेखील यात सहभागी होऊ शकणार आहेत. तुम्ही पाठवलेल्या डुडलची संकल्पना, त्यावरील संदेश आणि चित्रकला या आधारांवर तुमचे चित्र निवडण्यात येणार आहे.

स्पर्धेचे नियम

१. एक विद्यार्थी एकच डुडल पाठवू शकतो

- Advertisement -

२. ८.५ *११ पेपरवर तुम्हाला तुमचे चित्र रेखाटायचे आहे

३. कोणतेही रंग वापरुन तुम्ही चित्र काढू शकता

४. डुडलमध्ये इतर माध्यमांवर प्रसिद्ध असलेली पात्र चालणार नाहीत. अशा चित्रांना स्पर्धेतून बाद केले जाईल

५. ६ऑक्टोबरपर्यंत तुम्ही तुमचे डुडल पाठवणे गरजेचे आहे
(या शिवाय अन्य नियम गुगलने दिलेले आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -