Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Google Doodle: वयाच्या ६व्या वर्षी ऑस्कर मिळवणाऱ्या शर्ली टेंपल यांच्या आठवणीत गुगलचे...

Google Doodle: वयाच्या ६व्या वर्षी ऑस्कर मिळवणाऱ्या शर्ली टेंपल यांच्या आठवणीत गुगलचे खास डूडल

Related Story

- Advertisement -

गुगलने (Google) आज, बुधवारी आपले डूडल अमेरिकन अभिनेत्री, नर्तिका, गायिका आणि मुत्सद्दी शर्ली टेंपल यांच्या नावे केले आहे. आजच्या दिवशी २०१५मध्ये सेंट्रा मॉनिका हिस्ट्री म्युझियमने ‘Love, Shirley Temple’ नावाने त्यांच्या एका प्रदर्शनाची सुरुवात केली होती. यामध्ये त्यांच्या काही आठवणींच्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. टेंपल यांनी कमी वयात लोकप्रियता मिळवली होती. चित्रपटाच्या पडद्यापासून ते राजकारणाच्या स्टेजपर्यंत त्यांची दमदार हजेरी असायची.

२३ एप्रिल १९२८ साली टेंपल यांच्या जन्म कॅलिफोर्नियामध्ये झाला होता. वयाच्या १०व्या वर्षी पोहोचण्यापूर्वीच त्यांनी लोकप्रियता मिळवली होती. एवढेच नाही तर वयाच्या ६व्या वर्षी त्यांना अकादमी अवॉर्ड म्हणजेच ऑक्सर पुरस्कार मिळाला होता. गाळावर खळी आणि कुरळे केस असा लूक असणाऱ्या टेंपल यांनी ‘स्टँड अब अँड चीअर’ आणि ‘ब्राईट आइज’ सारखे अनेक चित्रपटात काम केले. मग वयाच्या २२व्या वर्षी रिटायर होऊन जनसेवासाठी आपले सर्व आयुष्य खर्ची घातले.

- Advertisement -

शर्ली टेंपल यांची ९३वी जयंती आहे. त्यानिमित्ताने गुगलने टेंपल यांना श्रद्धांजली देताना लिहिले आहे की, हॉलिवूडच्या शीर्ष बॉक्स ऑफिसच्या घसरणीनंतर टेंपलने आलेल्या बंदीत केवळ लाखो लोकांची मदत केली नाही तर आंतरराष्ट्रीय संबंधातून जगात आपले नाव काम करून कमावले. २००६मध्ये अभिनेत्री गिल्डने त्यांना लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित केले.

१९६९ साली संयुक्त राष्ट्रात अमेरिकेचे प्रतिनिधीत्व म्हणून टेंपल यांना नियुक्त करण्यात आले. आपल्या राजकीय कार्यकाळात त्यांनी घाना मध्ये राजदूत आणि परदेशी विभागात प्रोटोकोलची पहिली महिला प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. १९८८साली त्यांना मानद विदेश सेवा अधिकारी बनवले.


- Advertisement -

हेही वाचा – Surya Grahan 2021: यंदाचे पहिले सूर्यग्रहण उद्या लागणार; जाणून घ्या वेळ आणि बरंच काही


 

- Advertisement -