घरदेश-विदेशGoogle : ऑगस्टमध्ये जीमेल सेवा बंद होणार? गुगल म्हणते...

Google : ऑगस्टमध्ये जीमेल सेवा बंद होणार? गुगल म्हणते…

Subscribe

नवी दिल्ली : गुगलची (Google) जीमेल (Gmail) सेवा येत्या ऑगस्टपासून बंद होणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पत्रव्यवहाराचे प्रमुख माध्यम असलेल्यांसाठी ही चिंतेची बाब ठरली आहे. यासंदर्भात प्रत्यक्ष गुगलने शुक्रवारी स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : पवार-शिंदेंचे उमेदवार निवडणूक लढणार ‘कमळ’ चिन्हावर! राऊतांचा खळबळजनक दावा

- Advertisement -

एकेकाळी पार्सल तसेच पत्रव्यवहाराचे एकमेवर माध्यम असलेली टपाल सेवा कुरियर सेवेमुळे मागे पडली. त्यातच आता प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आल्याने जीमेलद्वारे पत्रव्यवहार करणे आणखी सुलभ झाले. गुगल कंपनी यावर्षी 1 ऑगस्ट रोजी “जीमेल बंद” करणार आहे. ऑगस्टनंतर ईमेल पाठवणे, प्राप्त करणे किंवा स्टोअर करण्यास जीमेल सपोर्ट करणार नाही, असा एक कथित जीमेलचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

ट्वीटर आणि टिकटॉक या सोशल मीडिया प्लैटफॉर्मवर हजारो लोकांनी हा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात क्रिएटर्सनी दावा केला आहे की, आपल्या नवीन AI इमेज टूल जेमिनीमुळे गुगलला प्रतिकूल प्रतिसाद मिळत आहे. वास्तविक, विविध वांशिक स्वरुपात नाझी सैनिकांची चित्रे तयार करण्यात आल्याने गुगलचे जेमिनी हे इमेज टूल वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

हेही वाचा – Maharashtra Politics : राजेश टोपे अजित पवारांच्या भेटीला, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

पण आता खुद्द गुगलने पुढे येत ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत, जीमेल सेवा बंद केली जात नसल्याचे स्पष्ट केले आहे.
अफवांबाबत खुलासा करण्यासाठी टेक तज्ज्ञांनी देखील सोशल मीडियाचा अवलंब केला आहे. गुगल कंपनी यावर्षी जीमेलने जानेवारी 2024मध्ये केवळ एचटीएमएल (HTML) व्हर्जन बंद केले आणि संपूर्ण ईमेल सेवा नाही. जीमेल अगदी व्यवस्थित सुरू आहे, असे तंत्रज्ञान शिक्षिका मार्शा कॉलियर यांनी सांगितले. सोशल मीडियामुळे अफवा लवकर वेगाने पसरत आहेत. त्यामुळे प्रत्येक वृत्ताची खातरजमा करण्याची आवश्यकता आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – Street Furniture : ‘सीएम’च्या काँट्रॅक्टर मित्रांना पाठीशी घालण्यासाठी…, आदित्य ठाकरेंचा आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -