घरताज्या घडामोडीGoogle Play Store वरून Hangouts होणार गायब, फक्त 'या' युजर्सना अॅप वापरता...

Google Play Store वरून Hangouts होणार गायब, फक्त ‘या’ युजर्सना अॅप वापरता येणार

Subscribe

गुगलने Gmailसह Hangouts हे अॅप प्ले स्टोरवरून काढून टाकले आहे. Google+ चे एक फिचर म्हणून २०१३ साली Google Hangouts हे अॅप लाँच करण्यात आले होते. परंतु आता Hangouts ची जागा Google Chat ने घेतली जात आहे. तसेच गुगल प्ले स्टोरच्या व्यतिरिक्त Hangouts ला Apple च्या App Store ने सुद्धा काढून टाकले आहे. ज्या Android युजर्सच्या मोबाईलमध्ये हे अॅप पहिल्यापासूनच उपलब्ध आहेत तेच युजर्स फक्त या अॅपचा वापर करू शकतात.

Play Store वरून Hangouts काढून टाकल्याची माहिती 9to5Googleने दिली होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये, Googleने दिलेल्या माहितीनुसार, गुगल चॅट हे Hangouts ची जागा घेणार आहे. २०२० मध्येHangouts ला Google Meet मध्ये विलीन करण्यात आले होते. जर तुमच्या आयफोनवर अॅप इन्स्टॉल असेल तर तुम्ही या अॅपचा वापर करू शकता. Google Play Store वर Hangouts अॅप उपलब्ध असून इन्स्टॉल करण्याचा पर्याय बंद करण्यात आला आहे.

- Advertisement -

गुगलकडून मागील वर्षातील नोव्हेंबर महिन्यात Hangouts च्या अॅपवरून व्हिडिओ कॉलिंगचे फिचर्स काढून टाकण्यात आले होते. त्यानुसार हे फिचर्स आता Google Meet वर वळवण्यात आले आहेत. ज्यांच्या फोनमध्ये हे अॅप इन्स्टॉल आहे. तेच युझर्स या अॅपचा वापर करू शकतात. मात्र, कोणत्याही प्रकारचं नवीन अपडेट युजर्स वापर करू शकत नाहीत. त्यामुळे हे अॅप बंद करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा बॅकअप डेटा असल्यास युझर्सने तो त्वरित घ्यावा, अशा प्रकारचं गुगलकडून आवाहन करण्यात आलं आहे.


हेही वाचा : Hero Motocorpवरील आयकर विभागाच्या धाडीत १ हजार कोटींचा घोटाळा उघड, शेअर्समध्ये १० टक्क्यांची घसरण

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -