घरदेश-विदेशGoogle-Kantar Report : ग्रामीण भारतात डिजिटल बातम्यांना अधिक पसंती; स्थानिक भाषेला महत्त्व

Google-Kantar Report : ग्रामीण भारतात डिजिटल बातम्यांना अधिक पसंती; स्थानिक भाषेला महत्त्व

Subscribe

नवी दिल्ली : सध्या डिजिटल युग असून भारतीय भाषांचे (indian languages) वर्चस्व झपाट्याने वाढत असल्यामुळे Google ने एका अभ्यासाद्वारे स्थानिक भाषांच्या वाचकांचे वर्तन आणि प्राधान्ये समजून घेण्यासाठी संशोधन केले. गुगल कंपनीने जाहीर केलेल्या Google-Kantar अहवालात असे म्हटले की, भारतातील निम्म्याहून अधिक इंटरनेट वापरकर्ते बातम्या ऑनलाइन वाचतात, तर त्यापैकी निम्मे लोक ऑनलाइन बातम्यांना सर्वात विश्वसनीय स्रोत मानतात.

अहवालात असे समोर आले की, शहरातील 37 टक्के इंटरनेट वापरकर्त्यांच्या तुलनेत ग्रामीण भारतातील 63 टक्के वापरकर्ते बातम्या ऑनलाइन वाचतात. Google-Kantar च्या अहवालानुसार डिजिटल वापरकर्त्यांमध्ये स्थानिक भाषेत बातम्या वाचण्याला अधिक प्राधान्य देतात. विशेष बाब म्हणजे इंटरनेट वापरणाऱ्या सक्रिय वापरकर्त्यांपैकी भारतीय भाषा वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. भारतातील स्थानिक भाषा वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे ऑनलाइन इकोसिस्टमलाही स्थानिक भाषेबाबत गंभीर झाल्या आहेत.

- Advertisement -

अहवालात असे समोर आले की, वाचक भारतीय भाषांची सामग्री किंवा बातम्यांसाठी 5 पेक्षा जास्त प्लॅटफॉर्मचा वापर करतात. यामध्ये सर्वाधिक वापरकर्ते ऑनलाइन बातम्यांसाठी यूट्यूबचा वापर करतात, त्यानंतर सोशल मीडिया आणि तिसऱ्या क्रमांकावर चॅटिंग ऍप्सच्या माध्यमातून बातम्या वाचल्या जातात आणि शेअरही केल्या जात असल्यामुळे बातम्या आणि मीडिया उद्योगालाही ऑनलाइन इकोसिस्टममधील बदल जाणवला असल्यामुळे गेल्या काही वर्षांत स्थानिक भाषेतील डिजिटल वृत्त प्रकाशकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

शीर्षक आकर्षक असणाऱ्या बातम्यांकडे अधिक कल
४५ टक्के वारकतर्ते मीडिया हाऊसच्या वेबसाइट्स आणि मोबाईल ऍप्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. खास करून मनोरंजन आणि गुन्हेगारी या प्रमुख श्रेणीमध्ये असलेल्या बातम्या सर्वाधिक वाचल्या जातात. याशिवाय हेल्थ, टेक्नॉलॉजी, फॅशन अशा बातम्या नसलेल्या श्रेणींचे लेखही वाचले जातात. संशोधनातून असे समोर आले की, वाचकांचा अशा बातम्यांकडे अधिक कल असतो, ज्यांचे शीर्षक आकर्षक असतात. त्यामुळे बातम्या किंवा लेख जास्त वाचले जातात.

- Advertisement -

स्थानिक किंवा त्यांच्या शहरातील बातम्यांना प्राधान्य
विश्वास, सोपी भाषा आणि विश्वसनीय बातम्यांचे स्रोत हे तीन घटक आहेत. ज्यांना भारतीय बातम्या प्रकाशक अधिक महत्त्व देतात. हिंदी आणि गुजराती भाषेतील स्थानिक बातम्यांच्या वाचकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, 10 पैकी 7 ऑनलाइन वापरकर्ते स्थानिक किंवा त्यांच्या शहरातील बातम्यांना प्राधान्य देतात. त्याच वेळी भाषेचा कमी दर्जा असणाऱ्या बातम्या, जास्त जाहिराती आणि खराब-कालबाह्य डिझाइनमुळे वाचकांचा वेबसाइट किंवा ऍपच्या बातम्या भ्रमनिरास करतात.

१५.३ कोटी वाचक बातम्यांबाबत जागरूक आणि गंभीर
आकडेवारी पाहिली तर, भारतीय भाषांमधील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 72.9 कोटी आहे, त्यापैकी 37.9 कोटी वापरकर्ते न्यूज ऍप्स, न्यूज वेबसाइट्स, सोशल मीडिया पोस्ट, फॉरवर्डेड मेसेज आणि बातम्यांसाठी यूट्यूबचा मोठ्या प्रमाणावर वापर. यापैकी १५.३ कोटी वाचक बातम्यांबाबत जागरूक आणि गंभीर असल्याचे दिसून आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -