12000 कर्मचाऱ्यांच्या कपातीनंतर गूगल ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; वाचा सविस्तर

गूगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेट कंपनीने तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. अल्फाबेट कंपनीने कर्मचारी कपात केल्याची माहिती रॉयटर्सने दिली. या कर्मचारी कपातीनंतर गूगल आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

गूगल सीईओ सुंदर पिचाई

गूगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेट कंपनीने तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. अल्फाबेट कंपनीने कर्मचारी कपात केल्याची माहिती रॉयटर्सने दिली. या कर्मचारी कपातीनंतर गूगल आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, गूगलचे सीईओ सुंदर पिचाई आगामी काळात कंपानातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याच्या तयारीत आहेत. (google layoff after 12000 employee cut now sundar pichai massive pay cut says sources)

टाऊन हॉल येथे एक बैठक झाली. या बैठकीत गूगलच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना “वरिष्ठ पदावरील सर्व कर्मचाऱ्यांच्या वार्षिक बोनसमध्ये कपात करण्यात येणार आहे”, असे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितले.

सुंदर पिचाई यांच्या घोषणेनंतर आता कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात देखील कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुगलने फक्त वार्षिक बोनसमध्ये कपातीची घोषणा केली आहे. मासिक पगारातील वेतनाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

वरिष्ठांच्या बोनस कपातीची टक्केवारी किती असेल आणि किती काळ तशीच राहिल याविषयी सुंदर पिचाई यांनी काही सांगितले नाही. कर्मचारी कपातीच्या काही आठवड्यांपूर्वी पिचाई यांना मोठी वेतनवाढ मिळाली होती. गूगलची मूळ कंपनी अल्फाबेटकडून ही वाढ मिळाली होती.

2020 च्या एका रिपोर्टनुसार, पिचाई यांचे वार्षिक उत्पन्न जवळपास 2 मिलिअन डॉलर आहे. IFL हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 रिपोर्टनुसार, सुंदर पिचाई यांच्या नेटवर्थमध्ये 20 टक्क्यांनी खाली असून सध्या त्यांची नेटवर्थ 5,300 कोटी आहे.

12,000 कर्मचाऱ्यांना नारळ

जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर 20 जानेवारीला गुगलने 12,000 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. कर्मचाऱ्यांना दिलेल्या पत्रात गुगलने म्हटले होते की, गुगलला 25 वर्षे झाली आहे. परंतु, सध्या गुगल कठीण परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे.


हेही वाचा – Layoffs 2023 : गूगलची पालक कंपनी अल्फाबेटने 12 हजार कर्मचाऱ्यांना काढले