घर ताज्या घडामोडी 'या' सर्च इंजिनमुळे आगामी काळात गुगलला मोठ्या तोट्याची शक्यता

‘या’ सर्च इंजिनमुळे आगामी काळात गुगलला मोठ्या तोट्याची शक्यता

Subscribe

गुगलचे सर्च इंजिन मागील अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. जगभरातील स्मार्टफोन युझर्सकडून गुगलला चांगली पसंती मिळत आहे. मात्र असे असले तरी, गेल्या काही दिवसांपासून गुगल सर्च इंजिनचे महत्त्व कमी होताना दिसत आहे.

गुगलचे सर्च इंजिन मागील अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. जगभरातील स्मार्टफोन युझर्सकडून गुगलला चांगली पसंती मिळत आहे. मात्र असे असले तरी, गेल्या काही दिवसांपासून गुगल सर्च इंजिनचे महत्त्व कमी होताना दिसत आहे. कारण सॅमसंग आणि ऍपलच्या स्मार्टफोनमध्ये गुगल (Google) सर्च इंजिन बाय डिफॉल्ट दिले जात होते. यातून गुगलला दरवर्षी मोठी कमाई होत असे. पण आता गुगलच्या जागी मायक्रोसॉफ्ट बिंग सर्च इंजिन म्हणून अधिक प्रसिद्ध होत आहे. (google may lose search on apple samsung devices to microsoft bing)

मायक्रोसॉफ्ट बिंग हे AI तंत्रज्ञानावर आधारित सर्च इंजिन आहे. सध्या हे सर्च इंजिन बाजारात दाखल झाले असून, गुगल सर्च इंजिनच्या मागोमाग आता मायक्रोसॉफ्ट बिंग सर्च इंजिनही अधिक प्रसिद्ध होत आहे. विशेष म्हणजे मायक्रोसॉफ्ट बिंगचे सर्चिंग गुगलपेक्षा खूपच सरस आहे. अशा परिस्थितीत सॅमसंगने गुगलचे डिफॉल्ट सर्च इंजिन सोडून आपल्या स्मार्टफोनमध्ये बिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे गुगलला आगामी काळात होणाऱ्या तोट्याची चिंता सतावत आहे.

- Advertisement -

आतापर्यंत सॅमसंग फोनमध्ये Google सर्च इंजिन बाय डिफॉल्ट देऊन, Google कंपनीला वार्षिक सुमारे $3 अब्ज महसूल मिळत होता. अशा परिस्थितीत गुगलचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, ॲपलने सॅमसंग प्रमाणे आपल्या स्मार्टफोनमध्ये Bing सर्च इंजिन देण्यास सुरुवात केली, तर ते Google ला दरवर्षी मोठा तोटा होणार आहे.

दरम्यान, ज्यामुळे गुगलने नवीन एआय आधारित सर्च इंजिनवर काम सुरू केले आहे, जे कंपनी लवकरच लॉन्च करू शकते. यासाठी गुगलने मॅगी या नवीन प्रोजेक्टवर काम सुरू केले आहे, जे ChatGPT सारखे AI चॅटबॉट्स तयार करेल.

- Advertisement -

2022 मध्ये गुगल सर्चचा व्यवसाय सुमारे $162 बिलियन होता. मात्र, एआय आधारित सर्च इंजिनमुळे गुगलचे नुकसान होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – रत्नागिरीत ठाकरे गटाला धक्का, उपनगराध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव मंजूर

- Advertisment -