घरदेश-विदेशगुगल न्यूज होणार बंद?

गुगल न्यूज होणार बंद?

Subscribe

युरोपियन युनियनच्या नवीन नियमांमुळे गुगलला आता कालकार आणि पत्रकारांना त्यांच्या कामासाठी पैसे द्यावे लागतील.

कोणतीही बातमी हवी असेल की आपण पटकन गुगल करतो. पण आता गुगलची ‘गुगल न्यूज’ ही सेवा लवकरच बंद होणार आहे. ही बातमी वाचून तुम्हाला थोड आश्चर्यचं वाटलं असेल. मात्र, सध्या ही सेवा भारतात नाही तर युरोपात बंद होणार आहे.  १२ सप्टेंबरला आलेल्या एका नव्या कॉपीराईटच्या आदेशानुसार टेक कंपनीने कलाकारांना आणि पत्रकारांना त्यांच्या कामासाठी पैसे देणे गरजेचे आहे. या आदेशाला अंमलात आणण्यासाठी प्रत्येक देशाने आपले स्वतःचे स्वायत्त स्थानिक कायदे बनविण्याची गरज आहे. आता गुगल न्यूजचे भविष्य मात्र युरोपियन युनियन कायद्यात काही बदल आणतो का यावर अवलंबून आहे. या नियमांमुळे आता संघर्ष करणाऱ्या न्यूज प्रकाशकांची भरपाई करण्यासाठी गरजेचे आहे. गूगलला मात्र या निणर्यामुळे खूप चिंता लागून राहिली आहे, असे गूगलचे वाइस प्रेसिडेन्ट रिचर्ड गिन्ग्रास यांनी गार्डियन यांच्याकडे व्यक्त केले.

गुगलला शुल्क लावण्याचा हा पहिला प्रयत्न नसून याआधीही २०१४ ला स्पेनमध्ये ही घटना घडली होती. स्पेनने २०१४ मध्ये बातमीच्या समूह साइट्सला पैसे देण्यासाठी त्यांनी नियम बनवले होते. त्या कारणामुळे गुगलला स्पेनमध्ये ही सेवा बंद करावी लागली होती. पारंपारिक मीडिया आउटलेट्सने कित्येकवेळा गुगलला सर्व जाहिरात महसूल आपल्याकडे वळवून घेण्यासाठी दोषी ठरवले आहे. मात्र, बऱ्याच न्यूज साइट्स त्यांच्या वेबसाइटवर रहदारी वाढवण्यासाठी या सेवेवर अवलंबून आहेत.

- Advertisement -

गुगल न्यूज ही कंपनीसाठी नफा कमवणारी सेवा नाही. परंतु वापरकर्त्यांना वेबसाइटवर अधिक वेळ घालविण्यासाठी त्यांना पैसे खर्च करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. गिन्ग्रासने असेही सांगितले की कंपनी गुगल न्यूजवर कोणत्यही प्रकारची जाहिरात चालवत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -