उन्हाळ्याची सुट्टी ‘गुगल’ ऑफिसमध्ये!

: Google news may shut down in European Union(EU)
युरोपियन युनियनच्या नवीन नियमांमुळे आता तिथे गुगल न्यूज कदाचित बंद होण्याची शक्यता आहे.

गुगल या जगविख्यात कंपनीने खास भारतीय विद्यार्थ्यांसाठी एका विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे. १०० शाळकरी मुलांनी त्यांच्या उन्हाळी सुट्टीतील काही दिवस गुगलच्या ऑफिसमध्ये घालवावेत, तिथले वातावरण अनुभवावे, कामाचे स्वरुप जाणून घ्यावे अशी गुगल कंपनीची इच्छा आहे. या उद्देशातून गुगलने या समर कॅम्पचे आयोजन केले आहे.

‘चार आठवडे.. चार कॉनेस्ट’

गुगलच्या हैदराबाद आणि गुडगाव येथील कार्यालयांमध्ये एकूण १०० शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष कॉन्टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. एका आठवड्याला एक असाईनमेंट अशा प्रकारे एकूण चार असाईनमेंट्स विद्यार्थ्यांना दिल्या जातील. ”या असाईनमेंट्समुळे विद्यार्थ्यांना खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि सोबतच खास ‘गुगली’ वातावरण अर्थात गुगल ऑफिसमधील प्रसन्न आणि रंगीबेरंगी कल्चर, इथली काम करण्याची पद्धत, इथली शिस्त या गोष्टीही त्यांना जवळून अनुभवता येतील”, असे गुगलकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

गुगल ऑफिस- प्रातिनिधीक फोटो
थेट पालकांना लिहिले पत्र

या प्रोजेक्टची अधिकृत घोषणा करतेवेळी गुगलने थेट भारतीय पालकांसाठी एक ‘ओपन लेटर’ जाहीर केले. गुगलने या पत्राद्वारे विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. पत्रात लिहिलेल्या मजकुरामध्ये गुगलने म्हटले आहे, ”पालकांनी देखील आपल्या मुलांसोबत ‘समर विथ गुगल’ या खास कॅम्पमध्ये सहभागी व्हावे. जेणेकरुन तुमच्या मुलांची ही अॅक्टिव्हिटी त्यांच्यासाठी अधिक मजेशीर आणि अविस्मरणीय बनेल. गुगलच्या हैदराबाद आणि गुडगाव येथील कार्यालयांमध्ये चार आठवडे चालणाऱ्या या समर कॅम्पमध्ये देशभरातील एकूण १०० विद्यार्थी आणि त्यांचे पालक सहभागी होऊ शकतात.”

या समर कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेद्वारे निवडण्यात आले. सोमवार २८ मे पासून या समर कॅम्पला सुरुवात झाली असून, पुढील चार आठवड्यांपर्यंत या कॅम्पमध्ये मुलांना विविध क्रिएटीव्ह असाईनमेंट्स दिल्या जातील. ‘या कॅम्पद्वारे आणि त्यामध्ये दिल्या जाणाऱ्या विविध प्रोजेक्ट्समुळे मुलांच्या बुद्धिमत्तेला आणि त्यांच्या क्रिएटिव्हिटीला चालना मिळेल आणि याचा फायदा नक्कीच त्यांचा सर्वांगीण विकासाठी होईल’, असा विश्वास गुगलने व्यक्त केला आहे.