घरदेश-विदेशGoogle pay : तांत्रिक चुक आणि वापरकर्त्यांच्या खात्यात ८० हजार रुपये जमा;...

Google pay : तांत्रिक चुक आणि वापरकर्त्यांच्या खात्यात ८० हजार रुपये जमा; नेमकं काय आहे प्रकरण?

Subscribe

नवी दिल्ली : ‘गुगल पे’ (Google pay) आपल्या अनेक वापरकर्त्यांच्या खात्यात (users account) कॅश बॅगच्या (Cash bag) स्वरुपात जवळपास ८०,००० रुपये जमा झाल्यामुळे त्यांना एक सुखद धक्का बसला. अचानक आपल्या खात्यात अशाप्रकारे एवढे पैसे आलेले पाहून अनेकांना आनंद झाला. मात्र, हा आनंद फार कमी काळ टिकला नाही. गुगल पेच्या एका तांत्रिक चुकीमुळे हा सर्व प्रकार घडल्याचे नंतर समोर आले.

गुगल पेच्या एका तांत्रिक चुकीमुळे अचानक ८० हजार रुपये वापरकर्त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले. त्यांना कॅशबॅक स्वरुपात रिवार्डमध्ये हे पैसे आलेले पाहून सुखद धक्का बसला. मात्र अनेकांना हे पैसे आपल्याला का मिळाले हा प्रश्न पडला  आहे. मात्र गुगल पेच्या तांत्रिक विभागाला ही चूक लगेच लक्षात आली आणि त्यांनी जमा केलेले पैसे पुन्हा परत घेतले. एका वापरकर्त्यांने याबाबत ट्वीट केले आहे. त्याने म्हटले की, “सध्या गुगल पे वापरकर्त्यांना मोफत पैसे वाटत आहे असे दिसते. मी गुगल पे सुरू केले आणि मला रिवार्ड्समध्ये ३ हजार ७७१ रुपये आल्याचं दिसून आले.”

- Advertisement -

पैसे खर्च केलेल्या वापरकर्त्यांना गुगल पे ने पाठवला मेल
तांत्रिक चुकीमुळे वापरकर्त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे गुगर पे च्या लक्षात येईपर्यंत काही वापरकर्त्यांनी हे पैसे लगेच वापरले. त्यामुळे गुगल पे कडून पुन्हा पैसे घेताना काही जणांच्या खात्यावर पैसेच नव्हते. अशा वापरकर्त्यांना गुगल पेने ईमेल पाठवला आहे. यात त्यांनी खात्यावर आलेले पैसे परत करणे तुम्हाला शक्य नसेल, तर ते पैसे तुमचे आहेत, असे म्हटले आहे. तसेच या वापरकर्त्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असेही गुगर पे ने स्पष्ट केल आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -