कर्ज देणाऱ्या दोन हजार ॲप्सना गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले

नवी दिल्ली – ग्राहकांच्या सुरक्षेसाठी गुगल आता महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यापार्श्वभूमीवर गुगलने प्ले स्टोअरवरून तब्बल दोन हजार ॲप्स डिलिट केले आहेत. कर्ज देणाऱ्या ॲप्सना गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहे. (Google remove 2000 loan apps from play store)

हेही वाचा – कर्मचाऱ्यांना मिळणार वीजबील भरण्यासाठी १८ हजार रुपये, ‘या’ कंपनीचा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून गुगल प्ले स्टोअरवर कर्ज देणारे अनेक ॲप्स निर्माण झाले. या ॲप्सच्या माध्यमातून अनेकजण कर्ज घेतात आणि कर्जाच्या विळख्यात अडकतात. तसेच, ग्राहकांची माहिती घेऊन इतरांना विकली जाते. त्यामुळे ग्राहकांची आर्थिक फसवणूक केली जाते. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गुगलने आता महत्त्वाची पावले उचलली आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ॲप्सना काढू टाकण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर आतापर्यंत दोन हजार ॲप्स काढून टाकण्यात आले आहे. तसेच, येत्या काळात ग्राहकांच्या सुरक्षेसाठी अनेक नियम अधिक कठोर करण्यात येणार असल्याची माहिती गुगल एसिया पॅसिफिक रीजनचे वरिष्ठ संचालक आणि ट्रस्ट अॅण्ड सेफ्टी हेडचे सॅकत मित्रा यांनी एका कार्यक्रमात दिली.

हेही वाचा – Video : डोमिनोज पिझ्झाच्या पीठावर ठेवलेय टॉयलेटचे ब्रश; फोटो व्हायरल होताच युजर्सचा संताप

जानेवारी महिन्यापासून गुगलने ही मोहीम सुरू केली आहे. नियम आणि अटींचं उल्लंघन केल्यामुळे गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप्स डिलिट करण्यात येत आहेत. तसेच, अनेक ॲप्स माहिती लपवतात किंवा अपुरी माहिती देतात, असा ॲप्सवरही कारवाई करण्यात येत आहे.