Paytm वापणाऱ्यांनो सावधान; नियम मोडल्यामुळे गुगलने प्ले स्टोअरवरुन Paytm हटवले

पेटीएम युजर्ससाठी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. गुगलने आज, शुक्रवारी गुगल प्ले स्टोअरमधून पेटीएम अॅप हटवले आहे. गुगलने हा निर्णय का घेतला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र पेटीएम अॅप गुगल प्ले स्टोअरच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे समजते. गुगलने यासंबंधी आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केले आहे की, ऑनलाइन कॅसिनोची परवानगी गुगल देत नाही. आम्ही अशा कोणत्याच अॅपला परवानगी देत नाही. जो ग्राहकांना अन्य दुसऱ्या वेबसाइटवर घेऊन जातो. असे करणे हे गुगल नितीचे उल्लंघन आहे. त्यामुळे आम्ही अशा अॅप्सवर कारवाई करत आहोत.

पेटीएम हे ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे लोकप्रिय अॅप आहे. मात्र गुगलने केलेल्या कारवाईमुळे हे अ‍ॅप वापरणाऱ्या ४५ कोटी युझर्सच्या पैशांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांना पडला आहे. गुगलने केलेल्या कारवाईसंदर्भात पेटीएमने ट्विटवरुन स्पष्टीकरण दिले आहे. हे अ‍ॅप वापरणाऱ्या युझर्सला काळजी करण्याची गरज नसून त्यांचे पैसे सुरक्षित असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्याचप्रमाणे लवकरच आम्ही परत या प्लॅटफॉर्मवर येऊ, असे म्हटले आहे.

Paytm आणि UPI अॅप One97 Communication Ltd ने डेव्हलप केलेला आहे. या अॅपला गुगल प्ले स्टोअरवर सर्च केल्यानंतर ते अॅप आता या ठिकाणी दिसत नाही. परंतु, ज्यांच्या स्मार्टफोनमध्ये आधीपासून हे अॅप आहे ते सध्या काम करत आहे. पेटीएम अॅप शिवाय कंपनीचे अन्य अॅप्स Paytm for business, Paytm money, Paytm mall आदी गुगल प्ले स्टोअरवर अद्याप उपलब्ध आहेत. गुगल प्ले स्टोअरमधून हटवल्यानंतर पेटीएमकडून यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

हेही वाचा –

Corona: चष्मा घालणाऱ्यांना कोरोनाचा धोका कमी!