घरताज्या घडामोडीगूगलची सेवा डाऊन; सोशल मीडियावर स्क्रीनशॉटचा वर्षाव

गूगलची सेवा डाऊन; सोशल मीडियावर स्क्रीनशॉटचा वर्षाव

Subscribe

जगातील प्रत्येक नागरिकासाठी माहितीचे साधन असलेले गूगल डाऊन झाले होते. मंगळवारी सकाळी काही मिनिटांसाठी डाऊन झाले होते. गूगल डाऊन झाल्याचे समजताच कंपनीनंही तात्काळ कारवाई करत तातडीनं गूगलची सेवा पुन्हा सुरू केली.

जगातील प्रत्येक नागरिकासाठी माहितीचे साधन असलेले गूगल डाऊन झाले होते. मंगळवारी सकाळी काही मिनिटांसाठी डाऊन झाले होते. गूगल डाऊन झाल्याचे समजताच कंपनीनंही तात्काळ कारवाई करत तातडीनं गूगलची सेवा पुन्हा सुरू केली. परंतु गूगल आज सकाळी का डाऊन झालं होतं, याचं कारण अजून समोर आलेले नाही. (google search engine down world wide issue)

गूगल डाऊन झाल्यामुळे युजर्सला तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला. तसेच, सकाळी काम करत असताना अचानक गूगल काम करत नसल्याने युजर्सनी याबाबतचे स्क्रिनशॉट काढत ट्विटरवर शेअर केले. तसेच, गूगल डाऊन का झाले असल्याचे गूगल कंपनीला विचारण्यात आले. अनेक युजर्सनी सोशल मीडियावर स्क्रिनशॉट शेअर केल्याने गोंधळ उडाला होता.

- Advertisement -

गूगल डाऊन झालं त्यावेळी अनेक युजर्सना सर्च करताना समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यावेळी युजर्सना स्क्रिनवर 500 That’s an error मेसेज दिसत होता. गूगल युजर्स वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सर्च करताना येणाऱ्या एररचे स्क्रिनशॉर्ट्स शेअर करत आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास 10 मिनिटांसाठी डाऊन झाले होते. युजर्सने ट्विटरवर केलेल्या तक्रारीनंतर कंपनीने याची दखल घेत तात्काळ गूगलची सेवा पुन्हा सुरू केली. गूगल काही वेळ बंद पडल्याने अनेक युजर्सनी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर मीम्स शेअर केले आहे.

गूगल डाऊन झाल्याने सोशल मीडियावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्क्रिनशॉट शेअर केले होते. या स्क्रिनशॉट दखल घेत कंपनीने तातडीने सकाळी 7 वाजता बंद झालेले गूगल 10 मिनिटांनी पुन्हा सुरू केले.


हेही वाचा –  शिंदे सरकारकडून ‘मविआ’च्या आणखी एका निर्णयाला स्थगिती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -