घरट्रेंडिंगGoogle Search ला मायक्रोसॉफ्टच्या Chat GPTची कडवी टक्कर, जाणून घ्या वैशिष्ट्य

Google Search ला मायक्रोसॉफ्टच्या Chat GPTची कडवी टक्कर, जाणून घ्या वैशिष्ट्य

Subscribe

What is Chat Generative Pretrained Transformer | मायक्रोसॉफ्टच्या हे अॅप्लिकेशन गुगलला टक्कर देऊ शकतो. Chat GPT ला ३० नोव्हेंबर २०२२ रोजी लॉन्च करण्यात आले होते. याचे अधिकृत संकेतस्थळ chat.openai.com आहे.

What is Chat Generative Pretrained Transformer | नवी दिल्ली – तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरता तुम्ही गुगल करत असालच. पण तुम्ही गुगलच्या उत्तरांनी समाधानी होता का? गुगल सर्वच प्रश्नांची योग्य उत्तरे देतो का? तुमचं उत्तर नाही असेल तर मायक्रोसॉफ्टचं एक अनोखं अॅप्लिकेशनही उपलब्ध आहे. Chat GPT असं या अॅप्लिकेशनचं नाव असून गेल्या काही दिवसांपासून  हे अॅप्लिकेशन प्रचंड लोकप्रिय होत आहे. Chat GPT म्हणजे नक्की काय? त्याचा उपयोग कसा होतो? हे आपण जाणून घेऊयात.

Chat GPT काय आहे, असं गुगलवर सर्च केलं जातंय. Chat GPT म्हणजेच Chat Generative Pretrained Transformer. याला ओपन आर्टिफिशियल इंटेलिजेंस (Open AI)द्वारे बनवण्यात आले आहे. Chat GPT हा एकप्रकारचा चॅट बोट आहे. एक असा बोट ज्यात तुम्ही कोणताही प्रश्न विचारला तर त्याचं सविस्तर उत्तर तयार केले जाते. गुगलवर एखादा प्रश्न सर्च केल्यास त्यावर उपलब्ध असलेलीच उत्तरे आपल्याला प्राप्त होतात. म्हणजे, गुगला मर्यादा आहेत. मात्र, या Chat GPT ही अशी यंत्रणा आहे ज्यामुळे तुम्ही कोणताही प्रश्न विचारला की त्यावर सविस्तर उत्तर दिलं जातं. म्हणूनच, मायक्रोसॉफ्टच्या हे अॅप्लिकेशन गुगलला टक्कर देऊ शकतं. Chat GPT ला ३० नोव्हेंबर २०२२ रोजी लॉन्च करण्यात आले होते. याचे अधिकृत संकेतस्थळ chat.openai.com आहे.

- Advertisement -

हेही वाचा Google-Apple ला तगडी टक्कर देण्यासाठी स्वदेशी ‘BharOS’ सज्ज! जाणून घ्या वैशिष्ट्ये

GPT सारखे चॅट बॉट्स मोठ्या प्रमाणात डेटा आणि संगणकीय तंत्रांद्वारे प्रश्नांची उत्तरे तयार करतात. हे यंत्र ढोबळमानाने उत्तरे देत नाही तर सविस्तर आणि सखोल उत्तरे देतात. Google आणि Meta सारख्या इतर तंत्रज्ञान कंपन्यांनी त्यांची स्वतःची मॉडेल साधने विकसित केली असून अशा प्रोग्रामचा वापर करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली जातात. परंतु, Open AI ने तयार केलेला इंटरफेस थेट सामान्य लोक सहज वापरू शकतात.

- Advertisement -

सध्या, चॅट जीपीटीचा इंग्रजी भाषेत खूप वापर केला जात आहे. पण हिंदी आणि इतर भाषेतही ही यंत्रणा वापरण्यात यावी याकरता चाचणी सुरू आहे. या चॅट जीपीटीच्या वापरकर्त्यांची संख्या जवळपास २० लाखांपर्यंत पोहोचली आहे.

चॅट जीपीटीची सुरुवात कशी झाली

चॅट जीपीटीची सुरुवात सॅम ऑल्टमन आणि एलोन मस्क यांनी 2015 साली केली होती. 2015 मध्ये जेव्हा चॅट जीपीटी सुरू झाली तेव्हा ती एक ना-नफा कंपनी होती. परंतु 2017-18 मध्ये एलोन मस्क यांनी कंपनीला राजीनामा दिला. एलोन मस्क यांनी कंपनी सोडल्यानंतर मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक बिल गेट्स यांनी यात मोठी गुंतवणूक केली. शेवटी, 30 नोव्हेंबर 2022 रोजी मोयक्रोसॉफ्टने चॅट जीपीटी एक प्रोटोटाइप म्हणून सुरू केले. ऑल्टमन हे ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रमुख आहेत.

या एआय प्रोग्राम चॅट जीपीटीमधील एक खास वैशिष्ट्य म्हणजे चॅट जीपीटीने दिलेल्या माहितीवर तुम्ही समाधानी आहात की नाही, याची पडताळणी केली जाते. वापरकर्ते उत्तरावर समाधानी नसतील तर डेटामध्ये बदल करून बदल करून दिला जातो. वापरकर्ते समाधानी होत नाहीत तोवर हे अॅप डेटा देत राहतं.

कसं वापराल?

चॅट GPT वापरण्यासाठी, कोणत्याही वापरकर्त्याने प्रथम त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तेथे तुम्हाला एक खाते तयार करावे लागेल, ज्यानंतर चॅट GPT वापरता येईल. सध्या कंपनी चॅट GPT वापरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाही.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -