घरदेश-विदेशGoogle चं भन्नाट फीचर, आता ड्रायव्हिंग करतानाही कॉल- मेसेजला रिप्लाय देता येणार

Google चं भन्नाट फीचर, आता ड्रायव्हिंग करतानाही कॉल- मेसेजला रिप्लाय देता येणार

Subscribe

Google नेहमीच ग्राहकांसाठी काही तरी नवी आणयचा प्रयत्न करत असतो. दरम्यान Googleने आता असंच नवं भन्नाट फिचर्स भारतासह अन्य देशांसाठी आणले आहे. हे फिचर्स खास गाडी चालवणाऱ्या युजर्ससाठी आहे. गाडी चालवताना मोबाईल कॉलिंग आणि मेसेजवर बोलणे धोकादायक ठरते. मात्र अनेकदा सूचना देऊन आवाहन करुनही ड्राईव्हिंग करताना काही लोक मोबाईल किंवा मेसेजवर बोलताना सर्रास दिसतात. यामुळे स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालतात.

रस्ते अपघात टाळण्यासाठी Google एक नवे फीचर लॉन्च केले आहे. या फीचरमुळे युझर्सना गाडी चालवताना कॉल रिसिव्ह करणं आणि मेसेजला उत्तर देणं थोडं सोप्प होणार आहे. यापूर्वी Google चे Google Map हे फीचर लॉन्च झाले आहे. या फीचरला युजर्सचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याच Google maps फीचरमध्ये Google ने असिस्टंड ड्रायव्हिंग मोड ( Assistant Driving Mode) हे फीचर दिले असून या माध्यामातून ड्रायव्हिंग करताना कॉलवर बोलणे, किंवा मेसेजला रिप्लाय करणे सहस सोपे होणार आहे. हे फीचर यापूर्वी केवळ अमेरिकेसाठी उपलब्ध होते परंतु आता सिंगापुर, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि भारतासह काही देशांमध्येही उपलब्ध झाले आहे.

- Advertisement -

या फीचरच्या माध्यमातून युझर्सला आपल्या आपल्या आवाजाने कॉल आणि टेक्स सेंज रिसिव्ह करता येणार आहे. तसेच येणाऱ्या मेसेजला लगेच रिव्ह्यूदेखील करता येणार आहे. ही सर्व सुविधा नेव्हिगेशन न सोडता मिळणार असल्याचे गुगलने स्पष्ट केले आहे. हे Assistant Driving Mode युझर्सला नव्याने येणारे मेसेज वाचून ऐकवणापर आहे. जेणेकरुन युजर्सला ड्रायव्हिंग करताना एखादा महत्त्वाचा मेसेज आला तरी त्यासाठी फोन हातात घेण्याची गरज भासणार नाही. अँड्रॉईड युझर्सला इनकमिंग कॉलसाठी अलर्ट्सही मिळते. यामुळे युझर्स व्हॉईस कमांडनं आपल्या मोबाईलवर येणारे कॉल रिसिव्ह किंवा कट करू शकतात.

युझर्सला गुगल मॅपवर कोणत्याही डेस्टिनेशनसाठी नेव्हिगेशन ऑन ठेवावं लागंल. त्यानंतर त्यावर ड्रायव्हिंग मोडचं पॉपअप येईल. त्यानंतर त्यावर टॅप करावं लागेल. गुगलच्या म्हणण्यानुसार या ड्रायव्हिंग मोड फीचर वापरणे सोपे असणार आहे.यासाठी युझरला आपल्या अँड्रॉईड फोनमधील असिस्टंट सेटिंग्समध्ये जावं लागेल. तसंच हे गुगल ओपन असिस्टंट सेटिंग्स अशी कमांडवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशनमध्ये जाऊन ड्रायव्हिंग मोड सिलेक्ट करून ऑन करावा लागणार आहे. हे फीचर सध्या ४ जीबी रॅम आणि अँड्रॉईड व्हर्जन ९ पेक्षा वरच्याच मोबाईलसाठी असणार आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -