घरटेक-वेकGoogle भारतातील लघु उद्योग व्यावसायिकांना देणार कर्ज

Google भारतातील लघु उद्योग व्यावसायिकांना देणार कर्ज

Subscribe

कंपनी Google Pay for Business या अ‍ॅपद्वारे कर्ज देण्यासाठी वित्तीय संस्था आणि बँक यांच्याबरोबर काम करत आहे.

अमेरिकन टेक कंपनी गुगलने असे सांगितेल की, Google भारतातील लघु उद्योग व्यावसायिकांना कर्ज देणार आहे. कंपनी ही सेवा या वर्षापासून सुरू करणार असून ती सेवा Google Pay च्या माध्यमातून दिली जाणार आहे. भारतात बरेच लोकप्रिय असणारे पेमेंट अॅप म्हणून Google Pay वापरले जात आहे. कोरोना विषाणूमुळे लघु उद्योग व्यावसायिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागल्याचे दिसले. या पार्श्वभूमीवर Google ने लघु उद्योग व्यावसायिकांना कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे.

३० लाख व्यावसायिक हे अ‍ॅप वापरत आहेत

गुगलने म्हटले आहे की, कंपनी Google Pay for Business या अ‍ॅपद्वारे कर्ज देण्यासाठी वित्तीय संस्था आणि बँक यांच्याबरोबर काम करत आहे. भारतात कंपनीने गेल्या वर्षाच्या अखेरीस Google Pay for Business हे अ‍ॅप लॉंच केले होते. गुगलच्या म्हणण्यानुसार, ३० लाख व्यावसायिक Google Pay for Business हे अ‍ॅप वापरत आहेत. गुगलने २०१७ मध्ये भारतात Google My Business हे अ‍ॅप देखील सुरू केले होते. केवळ लघु उद्योगाला लक्ष्य करून कंपनीने याला लाँच केले होते.

- Advertisement -

व्यवसायाचा व्याप ऑनलाइन पद्धतीने वाढवणे शक्य

गूगल इंडियाच्या डायरेक्टर शालिनी गिरीश यांनी सांगितले की, “कोरोना साथीच्या आणि लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायांना पैशांची गरज आहे, विशेषत: लघु उद्योगांच्या गरजा वाढत आहेत जेणेकरुन ऑनलाईन तंत्रज्ञान अवलंबुन विचलित व पुनर्प्राप्ती कमी होण्यास मदत होईल.” Google My business अॅपमध्ये एक नवीन फीचर सादर करण्यात आले आहे, ज्या अंतर्गत व्यवसायाचा व्याप ऑनलाइन पद्धतीने वाढवणे शक्य होऊ शकते. त्यामुळे हा व्यवसाय Google वर शोधण्यास देखील सोपे असणार आहे.

जवळपासचे स्टोअर देखील Google Pay मध्ये जोडले गेले आहेत. याअंतर्गत, जवळपास असणाऱ्या ठिकाणातील स्टोअर्स शोधणे वापरकर्त्यांना सोपे जाईल आणि येथून डिजिटल पेमेंट देखील करता येणे शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे.


TikTok स्टार सिया कक्कडने केली आत्महत्या
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -