Android फोनसाठी Google नं बंद केलं ‘हे’ फीचर, नेमकं कारण काय?

google company

गुगलकडून युझर्ससाठी नवनवीन अपडेट सादर केले जाते. जेणेकरून युझर्सला चांगला अनुभव मिळू शकेल. गुगल कंपनीकडून भारतात विविध प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात. ज्यामध्ये Gmail, Google Photos, google play store यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. परंतु Android फोनसाठी Google नं एक फिचर बंद केलं आहे. त्यामुळे यामागील नेमकं कारण काय आहे. हे पाहणं महत्त्वाचं आहे.

गुगलने प्ले स्टोर आणि Apple App Store वर व्हॉइस प्लॅटफॉर्मसाठी एक नवीन अपडेट जारी केले आहे. गुगलने व्हॉइस हे फिचर Android आणि iOS मधून काढून टाकलं आहे. त्या व्यतिरिक्त स्मार्ट रिप्लाय सजेशन्स हे फीचर देण्यात आलं आहे. हे फिचर फेब्रुवारी 2022 मध्ये आलं होतं. हे फिचर काढण्यामागचं कारण आणि स्पष्टीकरण अद्यापही गुगलनं दिलेलं नाहीये.

गुगल व्हॉइस स्मार्ट रिप्लायचे उत्तर काय?

गुगलच्या या सुविधेत शेवटचा मेसेज आणि युझर्सला तीन पर्यंत संबंधित प्रतिसाद देता येऊ शकतो. गुगल व्हाइस अॅपमध्ये Type a message हे फिल्डच्या वर दिसते. स्मार्ट रिप्लाय फीचरसोबत युझर्स इन पिल्सवर टाइप करून आपण एखाद्याला त्वरीत मेसेज पाठवू शकतो.

Googleकडून फिचर काढण्यामागचं कारण काय?

गुगल व्हॉइस हे फिचर विशेषत: व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एंटरप्राइझ कॉलिंग सेवा मानली जाते. एखाद्या मजकूरला फारसे महत्त्व दिले जात नाही. कारण अॅपमध्ये RCS व्यवस्थित सपोर्ट करत नाही. त्यामुळे Google Voice अॅपमधून Google Voice Smart reply ला काढण्याचं हे एक कारण सांगितलं जात आहे.


हेही वाचा : देशात 131 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, XBB.1.5 आणि BF.7 व्हेरियंटचा कहर