घरटेक-वेकGoogle, YouTube आणि Gmail डाऊन; संवाद खुंटला, व्यापार थांबला

Google, YouTube आणि Gmail डाऊन; संवाद खुंटला, व्यापार थांबला

Subscribe

जगातील सर्वात मोठ सर्च इंजिन असलेल्या Googleची सेवा ठप्प.

जगातील सर्वात मोठ सर्च इंजिन असलेल्या Googleची सेवा आज अचानक ठप्प झाली आहे. सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी गुगलच्या जी-मेल, Hangout सह YouTube पेजवर एरर येऊ लागला. त्यामुळे युजर्सना या सेवा बंद झाल्याने मोठा फटका बसला आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे या सेवा बंद झाल्याने युजर्सचे काम देखील ठप्प झाले आहे.

- Advertisement -

#YouTubeDOWN #googledown ट्विटरवर ट्रेंड

गुगलची सेवा ठप्प होऊन काही सेकंद होत नाही तोवर ट्विटरवर #YouTubeDOWN #googledownचा ट्रेंड सुरु झाला. तर अनेकांनी या एररचे स्क्रिन शॉट काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे अनेक युजर्सने आपले काम ट्विटर आणि whatsapp द्वारे करण्यास सुरुवात केली.

जी-मेल लॉगिंनशिवाय सुरु होत YouTube

जी-मेल लॉगिंनशिवाय युट्यूबची सेवा सुरळीत होती. मात्र, जी-मेलवरुन लॉगिंन केल्यास युट्यूबवर एरर येत होता. त्यामुळे अनेकांनी आपले व्यवहार ट्विटरच्या माध्यमातून सुरु केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -