bangladesh durga puja : बांग्लादेशात दुर्गा पूजेदरम्यान हिंदू मंदिरांत गोळीबार, ३ जणांचा मृत्यू

Goons attack Hindu temples in Bangladesh during Durga Puja, 3 killed; paramilitary force called in
bangladesh durga puja : बांग्लादेशात दुर्गा पूजेदरम्यान हिंदू मंदिरांत गोळीबार, ३ जणांचा मृत्यू

बांग्लादेशातील हिंदू मंदिरांवर भीषण हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बांग्लादेशातील चांदपूर जिल्ह्यात दूर्गा पूजेदरम्यान कट्टरपंथीय जमावाने हिंदू मंदिरांवर हल्ला केला आहे. यावेळी झालेल्या चकमकीदरम्यान हल्लखोरांनी गोळ्या झाडून ३ जणांची हत्या केली. या घटनेमुळे या मंदिर परिसरांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकारे देशातील विविध भागांतील मंदिरांवर हल्ल्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

बांग्लादेशमधील बांग्लादेश हिंदू एकता परिषदेने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. परिषदेने ट्वीट करत सांगितले की, १३ ऑक्टोबर २०२१ हा बांग्लादेशच्या इतिहासातील निंदनीय दिवस आहे. अष्टमीला मूर्ती विसर्जनाच्या निमित्ताने अनेक पूजा मंडपांची तोडफोड केली आहे. हिंदूंना आता पूजा मंडपांचे रक्षण करावे लागेल. आज संपूर्ण जग शांत आहे. माता दुर्गाने सर्व हिंदूंवर तिचा आशीर्वाद कायम ठेवावा. कधीही त्यांना क्षमा करु नका.”

“बांगलादेश हिंदू एकता परिषदेने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे हिंदूंना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. परिषदेने ट्विट करत म्हटले की, जर बांगलादेशच्या मुस्लिमांना नको असेल तर हिंदू पूजा करणार नाहीत. पण किमान हिंदूंना वाचवा. हा हल्ला अजूनही सुरू आहे. कृपया सैन्य पाठवा. आम्हाला पूजा मंडपात बांगलादेशचे सैन्य हवे आहे.


राज्य सरकारची आमदारांना दसऱ्याची भेट; आमदार निधी चार कोटींवर