Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी फ्लिपकार्टवर बुक केला 87 हजारांचा कॅमेरा, पण पार्सलमध्ये आले दगडधोंडे

फ्लिपकार्टवर बुक केला 87 हजारांचा कॅमेरा, पण पार्सलमध्ये आले दगडधोंडे

Subscribe

ज्या पध्दतीने जग वेगाने डिजिटलायझेशनकडे वळाले आहे, त्याच वेगाने ऑनलाइन फसवणुकीच्या घटना देखील वाढल्या आहेत. मागील काही काळात मोबाईची ऑनलाइन खरेदी केल्यास डिलेव्हरीच्यावेळी फसवणूक झाल्याच्या घटना वाढल्या होता. अशातच आता एका व्यक्तिने फ्लिपकार्टवरून कॅमेरा बुक केला होता.

ज्या पध्दतीने जग वेगाने डिजिटलायझेशनकडे वळाले आहे, त्याच वेगाने ऑनलाइन फसवणुकीच्या घटना देखील वाढल्या आहेत. मागील काही काळात मोबाईची ऑनलाइन खरेदी केल्यास डिलेव्हरीच्यावेळी फसवणूक झाल्याच्या घटना वाढल्या होता. अशातच आता एका व्यक्तिने फ्लिपकार्टवरून कॅमेरा बुक केला होता. मात्र त्याला डिलेव्हरीच्या वेळी त्या पार्सलमध्ये दगड सापडल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नेमकी घटना काय?

- Advertisement -

4 फेब्रुवारी रोजी कुशीनगर जिल्ह्यातील आंद्रेश कुमार राय याने सिव्हिल लाइन्सच्या संगम दुबे यांच्या नावावर फ्लिपकार्टवर 87 हजार 990 रुपयांना कॅमेरा बुक केला होता. आंद्रेशने त्याचवेळी क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पैसेही भरले होते. 8 फेब्रुवारीला बुक केलेला कॅमेरा ईकार्टवर पोहोचला. त्यानंतर डिलिव्हरी बॉयने ते पार्सल संगमच्या घरी नेले. त्यावेळी कार्डबोर्डमध्ये बंद केलेला कॅमेरा त्याला दिला. सीलबंद पार्सल जड लागत असल्याने संगमने डिलिव्हरी बॉयसमोर पार्सल उघडले. त्यावेळी त्याला दोन दगडं त्या पार्सलमध्ये सापडली.

याप्रकरणी संगमने कस्टमर केअर आणि एकर्टच्या व्यवस्थापकाकडे याबाबत तक्रार दाखल केली. यावर तोडगा न निघाल्यास संगमने सायबर सेल पोलिसांकडे याबाबत तक्रार करणार असल्याते सांगितले.

- Advertisement -

तंत्रज्ञानाच्या आगमनाने जीवन खूप सोपे झाले आहे. प्रत्येक कामात आता Technology चा वापर होतो. त्याशिवाय, दैनंदिन आयुष्याची कल्पना करणेच अशक्य झाले आहे. वीज बिल भरणे, तिकीट बुक करणे, यासह अनेक महत्वाची कामं करण्यासाठी इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. पण, इंटरनेटच्या अतिवापरामुळे ऑनलाइन फसवणूक, Cyber Attacks , Online Scams आणि इतर अनेक सायबर गुन्ह्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे गेल्या काही काळात पाहायला मिळाले आहे.


हेही वाचा – अदानी पोर्ट्सचे 5000 कोटी पुढील आर्थिक वर्षात निकाली काढले जाणार; नेमकं प्रकरण काय?

- Advertisment -