घरदेश-विदेशनौदलाची ताकद वाढणार; संरक्षण सामग्रीसाठी ४६ हजार कोटी मंजूर

नौदलाची ताकद वाढणार; संरक्षण सामग्रीसाठी ४६ हजार कोटी मंजूर

Subscribe

नौदलासाठी १११ हेलिकॉप्टर खरेदी केली जाणार आहेत. त्यामुळे नौदलाच्या ताकदीमध्ये आणखीन वाढ होणार आहे.

भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांनो सावधान! कारण नौदलाच्या ताकदीमध्ये आणखीन वाढ होणार आहे. संरक्षण मंत्रालयाने नौदलासाठी ४६ हजार कोटी रूपये मंजूर केले आहेत. या निधीतून नौदलासाठी १११ हेलिकॉप्टरची खरेदी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे १५० तोफखाना बंदूक प्रणाली देखील खरेदी केली जाणार आहे. ४६ हजार कोटी रूपयांपैकी २१ हजार कोटी रूपये हेलिकॉप्टर खरेदीसाठी खर्च केले जाणार आहेत. लष्करासाठी शस्त्रास्त्र खरेदी करण्याचा निर्णय आज ( शनिवारी ) डीएसी अर्थात संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. याविषयी बोलताना, डीएसीनं १११ हेलिकॉप्टरच्या खरेदीला मंजुरी दिली. त्याकरता २१ हजार कोटी रूपये खर्च केले जातील अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. संरक्षण मंत्रालयानं धोरणात्मक भागीदारीअंतर्गत हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला चालना देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

कोणती शस्त्रास्त्र खरेदी करणार?

यावेळी नौदलासाठी १११ हेलिकॉप्टरची खरेदी केली जाणार आहे. याकरता २१ हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत. तसेच हेलिकॉप्टर व्यतिरिक्त लष्करासाठी १५५मिमीच्या १५० तोफखाना बंदूकांची देखील खरेदी करण्यात येणार आहे. दरम्यान, या बंदुका भारतामध्येच तयार केल्या जातील. तसेच, आखूड टप्प्यातील क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी देखील मंजुरी दिली गेली आहे. मागील अनेक दिवसांपासून ही खरेदी प्रलंबित होती. पण, यामुळे मात्र नौदलाच्या ताकदीमध्ये वाढ होणार हे नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -