घर देश-विदेश सरकारच्या ज्योतिषांनी म्हणे..., लोकसभा निवडणुकांवरून ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा

सरकारच्या ज्योतिषांनी म्हणे…, लोकसभा निवडणुकांवरून ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुका मात्र वेळेच्या आधीच, म्हणजे डिसेंबर महिन्यातच घेतल्या जातील, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. विद्यमान लोकसभेची मुदत 2024 मध्ये संपत असताना मोदी-शहा 2023 सालात निवडणुका का घेतील? याचे उत्तर सोपे आहे. सरकारच्या ज्योतिषांनी म्हणे तसा सल्ला दिला आहे. आता हे ज्योतिषी आहेत की तांत्रिक-मांत्रिक हे त्यांनाच माहीत, अशा शब्दांत ठाकरे गटाने भाजपावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – नीती आयोगाच्या हाती मुंबईची सूत्र, संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका

- Advertisement -

भाजपाकडे व त्यांच्या पाठीराख्यांकडे अमर्याद साधनसंपत्ती आहे. ही संपत्ती कशा पद्धतीने येते याचे एक साधे उदाहरण आम्ही देतो. ‘चांद्रयान 3’ मोहिमेचा एकूण खर्च किती झाला? तर 650 कोटी रुपये आणि दिल्लीतील द्वारका एक्सप्रेस वेच्या 3 किलोमीटर रस्त्याचा खर्च 750 कोटींवर गेल्याचे उघड झाले. जे काम फार तर 75 कोटींत व्हायला हवे ते 750 कोटींवर गेले. मग मधल्या पाचशे कोटींचा हिशेब कोठे गेला? ते भाजपाच्या तिजोरीत गेले की भाजपा पुरस्कृत ठेकेदाराच्या खिशात? असा सवाल ठाकरे गटाने सामना दैनिकातील अग्रलेखातून विचारला आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदे यांचा संजय राऊतांना धक्का, माजी नगरसेवक उपेंद्र सावंत शिवसेनेत

- Advertisement -

विरोधकांनी उचलला सत्तापरिवर्तनाचा विडा
भाजपाचे खासदार डी. अरविंद यांनी सांगितलेच आहे की, ‘ईव्हीएम’चे कोणतेही बटण दाबा, मत भाजपालाच पडत असते. याचा अर्थ असा की, सर्व हेलिकॉप्टर्सबरोबर लाखो ‘ईव्हीएम’ही भाजपने बुक करून ठेवलीत. त्याबाबतही त्यांचा वेगळा खर्च आणि हिशेब असणारच. अर्थात भाजपाने कितीही काहीही बुक केले तरी यावेळी मतदार भ्रष्ट ईव्हीएमच्या छाताडावर पाय ठेवून हुकूमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत. ‘इंडिया’ आघाडीने 2024 साली देशात सत्तापरिवर्तन करण्याचा विडाच उचलला आहे. हा ‘2024’चा वाईट काळ 2023च्या मावळतीस तंत्र-मंत्र, ईव्हीएम विद्येने नष्ट करता येईल काय? यावर म्हणे अंतस्थ गोटात खलबते सुरू आहेत, अशी खोचक टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – …तरी मोदी-शहांच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ आहे, ठाकरे गटाला विश्वास

…म्हणूनच इंडिया आघाडीचा जन्म
ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले की, भाजपा जर तिसऱ्यांदा सत्तेत आला तर लोकशाहीचे पूर्ण उच्चाटन होऊन हुकूमशाही लागू केली जाईल. ममता बॅनर्जी यांची चिंता खरी आहे. मोदी-शहा व त्यांचे गुजरातच्या धनिक मित्रमंडळाने लोकशाहीचा गळा कधीच घोटला आहे. 2014 सालापासून मोदी सरकारची पावले हुकूमशाहीकडे वळू लागली होती. 2019मध्ये त्यांनी लोकशाहीला जवळजवळ वधस्तंभावर लटकवले व आता 2024मध्ये वधस्तंभाचा खटका ते ओढतील ही भीती आहे. पण या देशाची चिंता भारतमातेस आहे. भारतमाता म्हणजे मोदी-शहा-अदानी नसून 140 कोटी जनता. ही जनता 2024मध्ये हुकूमशाही प्रवृत्तीचा पराभव करून वधस्तंभावरील लोकशाहीची प्राणप्रतिष्ठा करील. त्यासाठीच ‘इंडिया’ आघाडीने जन्म घेतला आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisment -