सरकारच्या ‘या’ योजनेत निवृत्तीनंतर पेंशनचे चांगले पर्याय उपलब्ध, पती-पत्नी घेऊ शकतात फायदा; जाणून घ्या सविस्तर

government atal pension yojana scheme husband and wife fixed income after retirement get 10 thousand rupees
सरकारच्या 'या' योजनेत निवृत्तीनंतर पेंशनचे चांगले पर्याय उपलब्ध, पती-पत्नी घेऊ शकतात फायदा; जाणून घ्या सविस्तर

जर तुम्ही निवृत्तीनंतर उत्पन्नासाठी गुंतवणुकीचे नियोजन करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण आम्ही तुम्हाला सरकारच्या अशा एका योजनेबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला कमी गुंतवणुकीत पेंशनची हमी मिळेल. आम्ही सरकारच्या अटल पेंशन योजनेबद्दल तुम्हाला सांगत आहोत. या योजनेत निवृत्तीनंतर पेंशनचे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. जाणून घ्या या योजनेबद्दल…

पती-पत्नी दोघांना होईल फायदा

पती-पत्नी दोघे सुद्धा अटल पेंशन योजनेचा फायदा घेऊ शकतात. यामध्ये दोघे वेगवेगळी गुंतवणूक करतील तर त्यांना १० हजार रुपयांपर्यंत महिन्याला पेंशन मिळू शकते. सरकारकडून अटल पेंशन योजनेत वयाच्या ६०नंतर १ हजार रुपयापासून ५ हजार रुपये महिना पेंशनची हमी दिली जाते. या योजनेत वयाच्या ४० वर्षापर्यंत कोणीही व्यक्ती गुंतवणूक करू शकतो.

वया ६० वर्षांनंतर वर्षाला मिळून शकतात ६०,००० रुपये पेंशन

अटल पेंशन योजनेत दर महिन्याला निश्चित रक्कम भरल्यानंतर निवृत्तीनंतर १ हजार रुपयापासून ५ हजार रुपये महिन्याला पेंशन मिळू शकते. तसेच दर ६ महिन्यात फक्त १२३९ रुपयांची गुंतवणूक केल्यावर वयाच्या ६० वर्षानंतर आयुष्यभर ५ हजार रुपये महिना म्हणजे ६०,००० रुपये वर्षाला पेंशनची हमी मिळेल.

दर महिन्याला फक्त २१० रुपये भरा

अटल पेंशन योजनेच्या नियमानुसार जर १८ वयापासून ५ हजार रुपये महिन्याला पेंशनसाठी गुंतवणूक करत असतील. तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला फक्त २१० रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही प्रत्येक तीन महिन्यात असे पैसे देत असाल तर ६२६ रुपये आणि सहा महिन्यात १,२३९ रुपये द्यावे लागतील. महिन्याला १ हजार रुपये पेंशन घेण्यासाठी जर १८ वयापासून गुंतवणूक करत असाल तर महिन्याला ४२ रुपये द्यावे लागतील.


हेही वाचा – फ्लॅट, दुकान खरेदी महागणार! ‘या’ कारणामुळे किंमतींमध्ये १५ टक्क्यांची होणार वाढ