घरदेश-विदेशभारताचा चीनवर डिजिटल स्ट्राईक, पुन्हा एकदा ४७ चीनी Apps वर बंदी!

भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राईक, पुन्हा एकदा ४७ चीनी Apps वर बंदी!

Subscribe

२५० चिनी Apps आहेत ज्यांची राष्ट्रीय सुरक्षेच्या उल्लंघनांबाबत चौकशी केली जाण्याची शक्यता

भारतात पुन्हा एकदा ४७ चिनी Apps वर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, हे Apps काही काळापूर्वी बंदी घातलेल्या अ‍ॅप्सचा क्लोन म्हणून काम करत होते. सरकारने यापूर्वी बर्‍याच लोकप्रिय Apps सह ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये टिक टॉक, वी चॅट, यूसी न्यूज आणि यूसी ब्राउझरचा समावेश आहेत. सरकारी सूत्रांच्या मते, अशी २५० चिनी Apps आहेत ज्यांची राष्ट्रीय सुरक्षेच्या उल्लंघनांबाबत चौकशी केली जाऊ शकते.

PUBG आणि AliExpress बंद होण्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, चिनी Apps ची नवीन यादी तयार केली जात असून यात काही टॉप गेमिंग अ‍ॅप्सचा समावेश आहे. पुढील यादीनंतर भारतात अनेक लोकप्रिय चीनी खेळांवरही बंदी घातली जाऊ शकते. अहवालानुसार, यंदा PUBG आणि AliExpress सारख्या लोकप्रिय Apps सह २०० हून अधिक Apps ची यादी तयार केली जात आहे. भारतात या Apps चे कोट्यावधी युजर्स देखील आहेत.

- Advertisement -

PUBG चे चीनशीही बरेच कनेक्शन

तसेच हे चीनी Apps चीनबरोबर डेटा शेअर करतात असे सांगितले जात आहे. त्यामुळे सरकारी संस्था त्यांचा आढावा घेत आहेत. नव्या अ‍ॅप बंदीबाबत सध्या सरकारकडून कोणतेही निवेदन देण्यात आले नाही. दरम्यान आता असा प्रश्न आहे की, यंदा PUBG गेमिंग चीनी App लाही बंदी घालण्यात येईल का? कारण जरी या अ‍ॅपला पूर्णपणे चीनी म्हटले जात नसले तरी PUBG चे चीनशीही बरेच कनेक्शन असल्याचे सांगितले जात आहे.


देशात कोरोनाच्या Record Break टेस्टिंग; १ दिवसात ५ लाखांहून अधिक चाचण्या!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -