आणखी एका सरकारी कंपनीची विक्री, एकमेव सरकरी हेलिकॉप्टर कंपनी पवनहंस विकण्याचा निर्णय

government decision owned helicopter company Pawanhans sell
आणखी एका सरकारी कंपनीची विक्री, एकमेव सरकरी हेलिकॉप्टर कंपनी पवनहंस विकण्याचा निर्णय

देशातील अनेक हेलिकॉप्टर अपघातांसाठी कुप्रसिद्ध असलेली एकमेव सरकारी हेलिकॉप्टर कंपनी पवनहंस अखेर विक्रीस गेली आहे. गेली अनेक वर्षे ही कंपनी सरकारसाठी सेवा देत होती. मात्र ही कंपनी आता स्टार ९ मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकली आहे. त्यामुळे पवनहंस कंपनी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. मात्र ही कंपनी विकण्यामागचे कारण काय आहे? तसेच आत्तापर्यंत या हेलिकॉप्टरमुळे किती अनेक अपघात घडले आहेत.

केंद्र सरकारने देशातील एकमेव हेलिकॉप्टर कंपनी विकण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर 1985 मध्ये ही कंपनी सुरू झाली. 6 ऑक्टोबर 1986 रोजी पवनहंस यांनी ONGC साठी पहिले व्यावसायिक ऑपरेशन सुरू केले. त्याच्या ताफ्यात सध्या सुमारे 41 हेलिकॉप्टर आहेत. पवनहंस लिमिटेडची स्थापना झाली त्या काळात भारतीय कंपन्या हेलिकॉप्टर चालवत नव्हत्या.

त्यामुळे भारतातील हेलिकॉप्टर सेवा फारच मर्यादित होती आणि त्यातील तज्ञ मंडळीही कमी होती. त्यामुळे त्यावेळी पवनहंस ही देशातील एकमेव सरकारी हेलिकॉप्टर सेवा देणारी कंपनी होती. ONGC ला सेवा पुरवण्यासोबतच ही कंपनी अनेक राज्य सरकारांना सेवा पुरवत होती. मात्र सातत्याने आर्थिक संकटात अडकल्याने कंपनी अखेर विक्रीस काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

सरकारने ही कंपनी विकण्यामागे तीन मुख्य कारणं सांगितली आहेत. यातील पहिले कारण म्हणजे तीन वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या या कंपनीला 2018-19 या आर्थिक वर्षात सुमारे ६९ कोटींच्या तोटा सहन करावा लागला. यानंतर 2019 ते 20 दरम्यान हाच तोटा 28 कोटींनी वाढला. दरम्यान कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सने या कंपनीच्या विक्रीसाठी ३ वेळा प्रयत्न केला. पण त्यावेळी एकाही गुंतवणुकदाराने रस दाखवला नाही, त्यामुळे सरकारने या कंपनीचा हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला.

या कंपनीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारने प्रयत्न केले मात्र या प्रयत्नांना यश आले नाही. अनेक राजकीय पक्ष या कंपनीच्या हेलिकॉप्टरचा वापर करत होते. परंतु आता सरकारने पवनहंस लिमिटेड कंपनीची मालकी आता स्टार-9 मोबिलिटी कंपनीकडे सोपवली आहे. स्टार-9 मोबिलिटी कंपनीने 211.14 कोटी रुपयांना पवनहंस लिमिटेड कंपनी विकत घेतली आहे. सध्या या कंपनीवर 230 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने पवनहंस हेलिकॉप्टरचा रेकॉर्ड कधीच चांगला नव्हता. तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ सेवा देणारी पवनसंह हेलिकॉप्टर सेवेपेक्षा अपघातांमुळेच अधिक बदनाम झाली होती. सुरुवातीपासूनच इंजिनमधील समस्या, ऑइल लीकेज, सेन्सरच्या समस्या अशा अनेक समस्यांमुळे या कंपनीच्या हेलिकॉप्टर अपघाताच्या घटना घडल्या.

आत्तापर्यंत या हेलिकॉप्टर संबंधित 20 अपघात समोर आले आहे. यात 91 जणांनी आपले जीव गमावले, यात एकूण 60 प्रवासी आणि 27 पायलट आणि 4 क्रू मेंबर्सचा समावेश आहे. पवनहंस हेलिकॉप्टरच्या झालेल्या मोठ्या अपघातात एकही जण वाचू शकला नाही. २०१० ते १८ या काळात अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या.

ही कंपनी आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर कंपनी आहे. मात्र कंपनीच्या विक्रीवर आता काँग्रेसने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 6 महिन्यांपूर्वी झालेल्या कंपनीला ही कंपनी तुटपुंज्या किमतीत विकण्यामागचे कारण काय असा काँग्रेस नेते उपस्थित करत आहेत.


हेही वाचा : कोळशाच्या अपुऱ्या साठ्याचे संकट; त्यात सरकारनं रद्द केल्या ‘इतक्या’ ट्रेन