Coronavirus: गोरगरीब जनतेला पुढील तीन महिने ५ किलो गहू, तांदूळ मोफत देणार

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजणेअंतर्गत घोषणा

nirmala sitaraman
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण

देशात करोनाने कहर केला आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. करोनाचा फटका अर्थकारणावर बसला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे हाल झाले आहेत. दरम्यान, केंद्रिय अर्थमंत्री यांनी मोठी घोषणा केली आहे. गोरगरीब जनता, कामगारांसाठी १ लाख ७० हजार करोडची घोषणा केली आहे. ८० करोड गरीबांना याचा फायदा होणार आहे. ८० करोड जनतेला ५० किलो रेशन मिळणार. पुढील तीन महिने ५ किलो गहू, तांदूळ मोफत मिळणार आहे. यासोबतच १ किलो डाळही दिली जाणार आहे. अशी घोषणा निर्मला सितारमण यांनी केली. देशातील एकही व्यक्ती उपाशी राहू नये, असे निर्मला सितारमन म्हणाल्या.

अर्थमंत्र्यांनी केलेल्या अन्य महत्त्वाच्या घोषणा

  • मनरेगाअंतर्गत ५ करोड कुटुंबाला सरकार मदत करणार आहे. शेतकरी, मनरेगा, गरीब विधवा, गरीब पेन्शनर्स, दिव्यांगांना मदत मिळणआर आहे.
  • किसान सन्मान योजनेतील पहिला हप्ता तत्काळ दिला जाणार आहे.
  • ८ करोड ७० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एप्रिलमध्ये २ हजार रुपये जमा केले जाणार आहेत.
  • प्रत्येक कामगाराला २ हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
  • गरीब वृद्ध, गरीब विधवा, गरीब दिव्यांगांना अतिरिक्त १ हजार रुपये दिले जाणार आहेत.
  • २० करोड महिलांच्या जनधन खात्यात ५०० रुपये जमा होणार आहेत.
  • उज्ज्वलाद्वारे ८ करोड बीपीएल कुटुंबाला ३ महिने मोफत गॅस दिला जाणार आहे. पुढील तीन महिन्यांसाठी हा लाभ दिला जाणार आहे.
  • ६३ लाख स्वयंसहायता समुहांना प्रत्येकी २० लाख रुपये मिळणार आहेत.
  • दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत ७ कोटी कुटुंबांना लाभ मिळणार आहे.
  • ईपीएफओबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. संघटीत क्षेत्रातील नोकरदारांचा ईपीएफओचा पैसा ३ महिने केंद्र सरकार भरणार आहे. याचा फायदा १०० कर्मचारी आणि १५ हजार पेक्षा कमी पगार असलेल्यांना होणार आहे.