घरताज्या घडामोडीOmicron Variant Guidelines: ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुधारित गाईडलाईन्सची आजपासून अंमलबजावणी

Omicron Variant Guidelines: ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुधारित गाईडलाईन्सची आजपासून अंमलबजावणी

Subscribe

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन या नव्या कोरोना व्हेरियंटमुळे जगातील सर्व देशाची चिंता वाढली आहे. या नव्या व्हेरियंटला रोखण्यासाठी प्रत्येक देश कठोर पाऊले उचलत आहेत. ज्या देशातील लॉकडाऊन उठवण्यात आला होता, त्या देशात आता पुन्हा लॉकडाऊन लागू केला जात आहे. ओमिक्रॉनची तीव्रता लक्षात घेऊन काही देश शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लागू करत आहे. भारताने देखील ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सर्तकता बाळगण्यास सुरुवात केली आहे. भारताने सुधारित गाईडलाईन्स जारी केली असून आजपासून त्यांची अंमलबजावणी होणार आहे. या सुधारित गाईडलाईन्समध्ये काय आहेत निर्बंध वाचा…

  • ज्या देशात ओमिक्रॉनचा संसर्ग पसरला आहे, तिथून आलेल्या व्यक्तींची विमानतळावर कोरोना चाचणी बंधनकारक असणार आहे. जरी लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी कोरोना चाचणी केली जाणार आहे.
  • दक्षिण आफ्रिकेत अडकलेल्या भारतीयांना जर ओमिक्रॉनची लागण झाली असेल तर त्यांनी स्थानिक दूतावासांशी संपर्क साधावा, असे सांगितले आहे.
  • तसेच आजपासून (१ डिसेंबर) आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १४ दिवसांची ट्रॅव्हल हिस्ट्री देणे अनिवार्य आहे. शिवाय आरटी-पीसीआरचा नकारात्मक अहवाल देणे गरजेचे आहे.
  • ओमिक्रॉमचा संसर्ग पसरलेल्या देशातून येणाऱ्या नागरिकांना प्रवास करण्यापूर्वी ७२ तास आधी चाचणी करणे बंधनकारक आहे. त्यानंतर भारतातील विमानतळावर आल्यावर पुन्हा एकदा कोरोना चाचणी केली जाईल आणि ही चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्या व्यक्तीला क्वांरटाईन केले जाईल. तसेच त्या व्यक्तीचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवले जाईल.
  • जर विमानतळावर झालेल्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्या व्यक्तीला घरी जाण्याची परवानगी दिली जाईल. मग भारतात आल्यानंतर आठव्या दिवशी पुन्हा चाचणी करून त्या व्यक्तीला ७ दिवस स्वतःचे निरीक्षण करावे लागले.
  • महत्त्वाचे म्हणजे प्रवासासाठी तिकिट बुक करताना विमान कंपन्यांना हमी द्यावी लागेल. तसेच त्या प्रवाशांना मागील १५ दिवसांची ट्रॅव्हल हिस्ट्री विमान कंपन्यांना द्यावी लागणार आहे. जर आफ्रिकन देशात प्रवास केला असेल तर त्वरित सात दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरणमध्ये राहावे लागेल. यासाठी २ स्टार, ३ स्टार आणि ५ स्टार हॉटेलची व्यवस्था केली जाईल.
  • संस्थात्मक विलगीकरण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी बीएमसीचे रिचर्डसन अँड क्रुडास कोविड सेंटर राखीव ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा – कोरोनाच्या इतर व्हेरियंटपेक्षा दुप्पट वेगानं ऑमिक्रॉनचा फैलाव, WHO चा इशारा

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -