घरदेश-विदेशभारतात टेक कंपन्यांच्या मनमानीला बसणार चाप; फक्त दोन प्रकारचे चार्जर वापरता येणार

भारतात टेक कंपन्यांच्या मनमानीला बसणार चाप; फक्त दोन प्रकारचे चार्जर वापरता येणार

Subscribe

सध्या स्मार्टफोन, फीचर फोन, लॅपटॉप किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी तुम्हाला वेगवेगळे चार्जर वापरावे लागते. पण लवकरच तुमची या समस्येपासून मुक्त होण्याची शक्यता आहे. कारण भारत सरकार फक्त दोन प्रकारचे चार्जर भारतात वापर करण्यासंदर्भात विचार करत आहे. म्हणजेच भारतात तुम्हाला फोन किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रिक उपकरण चार्ज करण्यासाठी फक्त दोन प्रकारचे चार्जिंग पोर्ट मिळणार आहेत. यामुळे प्रत्येक वेळी नवीन चार्जर खरेदी करण्याची गरज लागणार नाही.

नुकतेच युरोपियन युनियनने असे पाऊल उचलले आहे. याठिकाणी इलेक्ट्रॉनिक गॅझेटसाठी आता एकच चार्जिंग पोर्ट उपलब्ध आहे. EU ने Type-C चार्जिंग पोर्टला मान्यता दिली आहे. पुढील वर्षापासून हा नियम पाळावा लागणार आहे. भारतातही असेच काही लवकरच होण्याची अपेक्षा आहे.

- Advertisement -

ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सर्व प्रमुख उद्योग संघटना आणि क्षेत्र विशिष्ट संघटनांची बैठक बोलावली आहे . ही बैठक 17 ऑगस्ट रोजी होणार आहे, ज्यामध्ये ‘घरगुती वापरासाठी मल्टीपल चार्जिंगचा वापर पूर्णपणे कमी करण्याचा विचार केला जाईल.

ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी गेल्या आठवड्यात या संदर्भात उद्योग क्षेत्रातील नेत्यांना पत्र लिहिले. अहवालांवर विश्वास ठेवला तर, रोहितने पत्रात म्हटले आहे की, भारतातील बहुतेक ग्राहक लहान आणि मध्यम आकाराच्या पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक डिव्हाईजचा वापर करतात. यात टाइप-सी चार्जिंग पोर्ट आहे. मोठ्या संख्येने युजर्स फीचर फोन देखील वापरतात, जे वेगळ्या चार्जिंग पोर्टसह येतात.

- Advertisement -

ते म्हणाले की, ‘फक्त दोन प्रकारचे चार्जिंग पॉइंट’ या फ्रेमवर्कवर काम सुरू करण्याची वेळ आली आहे. म्हणजेच स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट, इअरबड्स, स्पीकर यासारख्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या डिव्हाईससाठी चार्जिंग पोर्ट वापरला जाईल. त्याचवेळी दुसरा फीचर फोनसाठी वापरला येईल.

सरकारने हे धोरण लागू केल्यास त्याचा सर्वाधिक परिणाम अॅपलवर होणार आहे. Apple आपल्या स्मार्टफोनमध्ये लाइटनिंग केबल वापरते. इतकंच नाही तर अॅपल आयफोनसोबत बॉक्समध्ये चार्जरही देत नाही. अॅपलचा कमाईचा मुख्य स्रोत चार्जर आहे. अशा परिस्थितीत टाइप-सी किंवा इतर कोणतेही चार्जिंग पोर्ट सामान्य असल्यामुळे कंपनीच्या व्यवसायावर परिणाम होईल.


भारताला मंकीपॉक्सचा धोका? टास्क फोर्स तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घेऊ

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -