घरदेश-विदेशडोकलाम प्रश्नी नरेंद्र मोदी गंभीर नाहीत - राहुल गांधी

डोकलाम प्रश्नी नरेंद्र मोदी गंभीर नाहीत – राहुल गांधी

Subscribe

डोकलाम आणि पाकिस्तानच्या प्रश्नी सरकार गंभीर नाही. अशा शब्दात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा लक्ष्य केले आहे. पाकिस्तानशी चर्चा करण्याबाबत गंभीरपणे विचार करून केलेलं धोरणंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नाही. शिवाय, डोकलाम प्रश्नाकडे देखील एखाद्या इव्हेंट प्रमाणे पाहत आहेत. अशा शब्दात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकराला लक्ष्य केले आहे. लंडनमधील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या कार्यक्रमामध्ये राहुल गांधी बोलत होते. डोकलामध्ये आजही चीनचे सैन्य आहे. चीनच्या हालचालींवर नजर ठेवली गेली असती तर भारत – चीन वाद टाळता आला असता. अशा शब्दात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. यावेळी मागील चार वर्षाच्या कामगिरीवर देखील राहुल गांधी यांनी निशाणा साधला. चार वर्षामध्ये केंद्रातील सत्तेचं केंद्रीकरण झालं. मात्र यश हे विकेंद्रीकरणामुळे मिळतं. असं म्हणत राहुल गांधी यांनी १.३ अब्ज लोकांमध्ये भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. असा आरोप केला.

‘परराष्ट्र मंत्रालयावर PMOची मोनोपॉली’

पंतप्रधान कार्यालय परराष्ट्र मंत्रालयावर देखील एकाधिकारशाही राबवत आहे. परराष्ट्र मंत्र्यांकडे काहीच काम नाही. परिणामी लोकांना व्हिसा देण्यात परराष्ट्र मंत्रालय व्यस्त आहे. व्हिसा देण्याशिवाय अधिक महत्त्वाचे कोणतेही काम या खात्याकडे शिल्लक राहिलेले नाही. अशा शब्दात राहुल गांधी यांनी परराष्ट्र खात्याला लक्ष्य केले. तर वाढत्या दहशतवादाला पाकिस्तान जबाबदार असल्याचे देखील राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -