घरदेश-विदेशशेतकऱ्यांना 'या' वस्तूंवर मिळणार अनुदान, हिमाचल प्रदेश सरकारची घोषणा

शेतकऱ्यांना ‘या’ वस्तूंवर मिळणार अनुदान, हिमाचल प्रदेश सरकारची घोषणा

Subscribe

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून अनेक योजना राबविण्यात येतात. गेल्या काही दिवसात यूपी सरकार, राजस्थान सरकार, छत्तीसगड सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. आता हिमाचल प्रदेश सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे.

6 टक्के सूट –

- Advertisement -

याअंतर्गत हिमाचल सरकारने पॅकेजिंग साहित्याच्या खरेदीवर फळ उत्पादकांना आणि बागायत शेतकऱ्यांना 6 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सूट १५ जुलैपासून लागू होणार आहे.याबाबत हिमाचल प्रदेशच्या जनसंपर्क विभागाने निवेदन जारी केले आहे. या निवेदनात गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत  या योजनेसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे.

10 कोटींचे अनुदान –

- Advertisement -

HP हॉर्टिकल्चर प्रोड्युस मार्केटिंग अँड प्रोसेसिंग कॉर्पोरेशन (HPMC) मार्फत विकल्या जाणार्‍या कार्टन आणि ट्रेवर सबसिडी दिली जाईल. यासाठी एचपीएमसीला 10 कोटींचे अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी आणि शैक्षणिक कर्मचाऱ्यांसाठी यूजीसीनुसार वेतनश्रेणी सुधारणेची योजना राबविण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

३१ जुलैपर्यंत करा केवायसी –

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, जर तुम्ही ३१ जुलैपर्यंत तुमचे ई-केवायसी केले नाही तर तुम्हाला १२ वा हप्ता दिला जाणार नाही. पीएम किसानमध्ये अपात्र लोकांचा लाभ घेतल्याच्या बातम्यांनंतर ई-केवायसीचा निर्णय घेण्यात आला होता. यापूर्वी ३१ मार्च ही अंतिम तारीख होती. जी नंतर ३१ मे करण्यात आली आणि आता ३१ जुलै झाली आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -