घरदेश-विदेशRahul Gandhi : 'इंडिया'चे सरकार स्वामीनाथन आयोग लागू करणार; गांधींनी दिली MSPची...

Rahul Gandhi : ‘इंडिया’चे सरकार स्वामीनाथन आयोग लागू करणार; गांधींनी दिली MSPची गॅरंटी

Subscribe

नवी दिल्ली : किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करणे यासह अन्य मागण्यांसाठी दिल्ली आणि आसपासच्या राज्यांतून शेतकरी मोर्चा आज दिल्लीत धडकणार होता. मात्र शेतकऱ्यांना रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आला, तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आगामी काळात येणाऱ्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठी घोषणा केली आहे. (Government of India to implement Swaminathan Commission Rahul Gandhi guarantees MSP)

हेही वाचा – Politics : राज्यसभेसाठी शरद पवारांचा नवा मास्टरस्ट्रोक; ‘या’ उमेदवाराचा प्रस्ताव मांडला

- Advertisement -

काँग्रेस नेते राहुल गांधी आज भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त अंबिकापूरला पोहोचले होते. अंबिकापूर नगर येथील कला केंद्र मैदानावर आयोजित सर्वसाधारण सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, ‘आज शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. मात्र त्यांना थांबवले जात आहे, त्यांच्यावर अश्रुधुराचे नळकांडे डागले जात आहेत. परंतु ते फक्त त्यांच्या मेहनतीचे फळ मागत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

स्वामिनाथन अहवालावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपा सरकारने एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली, मात्र एमएस स्वामीनाथन यांनी जे सांगितले, ते अंमलात आणण्यास भाजपा तयार नाही. स्वामिनाथन यांनी त्यांच्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, शेतकऱ्यांना एमएसपीचा कायदेशीर अधिकार मिळाला पाहिजे, पण भाजपा सरकार तसे करण्यास तयार नाही. त्यामुळे इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही भारतातील शेतकऱ्यांना एमएसपीची हमी देणारा कायदा आणू. स्वामिनाथन अहवालात जे नमूद केले आहे, ते आम्ही पूर्ण करू, अशी घोषणा राहुल गांधी यांनी यावेळी केली.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : नांदेड हा काँग्रेसचाच बालेकिल्ला, कुठल्या…; पटोलेंची टीका

दरम्यान, अंबिकापूर येथील सर्वसाधारण सभेनंतर राहुल गांधी यांची यात्रा बलरामपूर जिल्ह्याकडे रवाना होणार होती. मात्र आज दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून निर्माण झालेल्या वादानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे आता राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पुन्हा कधी सुरू होणार? याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. राहुल गांधी अंबिकापूर दरिमा विमानतळावरून राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत दिल्लीला रवाना झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -