घरदेश-विदेशमुलींना 'या' राज्यात मिळणार मोफत स्कुटी, जाणून घ्या नोंदणीपासून पात्रतेशी संबंधित संपूर्ण...

मुलींना ‘या’ राज्यात मिळणार मोफत स्कुटी, जाणून घ्या नोंदणीपासून पात्रतेशी संबंधित संपूर्ण माहिती

Subscribe

सरकारी महाविद्यालये, विद्यापीठांव्यतिरिक्त खासगी विद्यापीठांचे विद्यार्थीनीही या योजनेचा लाभ घेऊ शकतील. ही योजना लवकरच सुरू होणार आहे. योगी आदित्यनाथ सरकारकडून हिरवा सिग्नल मिळताच पात्र विद्यार्थिनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

आज मुलींनी (girls) प्रत्येक क्षेत्रात आपले यश सिद्ध केले आहे. एक काळ असा होता जेव्हा मुलींना फारसे लिहिण्या-वाचण्याची परवानगी नव्हती आणि त्यांना घरची कामे करायला लावली जायची. पण आता काळ बदलला आहे. आज मुली केवळ अभ्यासातच नाही तर नोकरीतही मुलांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारही मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना (various schemes to promote girls) राबवत आहेत. या योजनांचा त्यांना थेट फायदा होत आहे.

उत्तर प्रदेश सरकारने (Uttar Pradesh government) मुलींसाठी राणी लक्ष्मीबाई योजना (Rani Lakshmibai Yojana for girls) सुरू केली आहे. याचा लाभ राज्यात राहणाऱ्या मुलींना लवकरच मिळणार आहे. राणी लक्ष्मीबाई योजनेंतर्गत गुणवंत मुलींना मोफत स्कूटी ( scootie) देण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात भाजपने जाहीरनाम्यात मुलींना मोफट स्कुटी देण्याची घोषणा केली होती. या योजनेनुसार, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींना मोफत स्कूटी दिली जाणार आहे. मुलींना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात येणार आहे.

- Advertisement -

सरकारी महाविद्यालये, विद्यापीठांव्यतिरिक्त खासगी विद्यापीठांचे विद्यार्थीनीही या योजनेचा लाभ घेऊ शकतील. ही योजना लवकरच सुरू होणार आहे. योगी आदित्यनाथ सरकारकडून हिरवा सिग्नल मिळताच पात्र विद्यार्थिनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थिनींकडे शैक्षणिक प्रमाणपत्रे, बँक खाते, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, वय प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र आणि आधार कार्ड आदी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. याशिवाय मुलीच्या कुंटंबाचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, अशीही अट आहे. या योजनेअंतर्गत सर्व गुणवंत विद्यार्थिनींना स्कूटी खरेदी करण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. स्कूटी मिळाल्यानंतर त्याचे कॉलेजला जाणे सोपे होईल.

- Advertisement -

सर्व गुणवंत विद्यार्थिनींचा डेटा मिळाल्यानंतर सरकार या योजनेवर बजेटनुसार काम करणार आहे. विद्यार्थिनींच्या निवडीसाठी बारावीच्या गुणांचा आधार घेतला जाईल. दुसरीकडे, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या मुलींसाठी त्यांच्या पदवीचे गुण विचारात घेतले जातील. यामधून निवड झालेल्या विद्यार्थिनींना मोफत स्कूटी योजनेचा लाभ मिळणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठीचे नियम

  • विद्यार्थिनीचे विद्यापीठ किंवा महाविद्यालयात शिक्षण सुरू असावे
  • तिला 10वी, 12वी मध्ये 75 टक्के गुण आवश्य
  •  बँक खाते आधारशी जोडलेले असावे.
  • योजनेसाठीचे अर्ज केवळ ऑनलाइन वैध असतील.
  • विद्यार्थिनीने इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -