Petrol Diesel Price : तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर काय?

मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्ली आणि मुंबईसह इंधन दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. काही दिवसांपूर्वी ८० पैशांच्या वाढीसह पेट्रोल आणि डिझेल दरात सतत वाढ होत होती. मात्र, इंधन दरात स्थिरता जाणवून आली. आज सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. याआधी तेल कंपन्यांनी सलग १४ वेळा किंमतीत वाढ केली होती.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर झाल्या आहेत, त्यामुळे कंपन्यांनीही त्यांच्या किमती वाढवणं थांबवलं आहे, असं पेट्रोल पंप डीलर्सचं म्हणणं आहे. तरीसुद्धा गेल्या १४ दिवसांमध्ये दरवाढीमध्ये पेट्रोल आणि डिझेल आधीच १० रुपयांनी महाग झाले आहे. आता दिल्लीत पेट्रोल १०५.४१ रुपये आहे. तर मुंबईत १२०.५१ रुपये लीटर भाव आहे. सर्वाधिक डिझेल दर मुंबईत १०४.७७ रुपये लीटर आहे.

चार प्रमुख शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर काय?

राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर १०५.४१ रूपये आणि डिझेलचे दर ९६.६७ रूपये प्रति लीटर इतकं आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर १२०.५१ रूपये आणि डिझेलचे दर १०४.७७ रूपये प्रति लीटर इतके आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ११०.८५ रुपये आणि डिझेल १००.९४ रुपये प्रति लीटर इतके आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल ११५.१२ रुपये आणि डिझेल ९९.८३ रुपये प्रति लीटर आहे.

जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत पुन्हा एकदा प्रति बॅरल ११० डॉलरच्या पुढे गेली आहे. त्यामुळे कंपन्यांवर पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा दबाव आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाहीये. दरम्यान, देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात.


हेही वाचा : गणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार