घरदेश-विदेशसरकार चीनवर करणार डिजिटल स्ट्राईक २

सरकार चीनवर करणार डिजिटल स्ट्राईक २

Subscribe

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये तणाव वाढत आहे. यामुळे सरकारणे सोमवारी देशाच्या सुरक्षिततेचे कारण देत ५९ चिनी मोबाईल अ‍ॅपवर बंदी घालण्याची घोषणा केली. तसेच गुगल आणि इंटरनेट प्रोव्हायडर्सनादेखील हे अ‍ॅप हटवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे चीन सरकारने याची मंगळवारी गंभीर दखल घेतली, परंतु सरकार आता चीनला डिजिटल प्लॅटफॉर्मवर चीनला अजून काही मोठे धक्के देण्याचे संकेत देत आहे. गरज पडल्यात अजून काही चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्यात येईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

भारत सरकारने या दृष्टीने आता अन्य चिनी अ‍ॅप कोणती आहेत याची चाचपणी सुरू केली आहे. केंद्र सरकारने सोमवारी टिकटॉक, हॅलो, कॅमस्कॅनरसह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घातली. तर आता सरकारने अजून काही चिनी अ‍ॅपवर कारवाई होऊ शकते असे सांगितल्याने त्याविषयीच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. कालच्या कारवाईमधून काही चिनी अ‍ॅपना वगळण्यात आले होते. त्यामध्ये काही मोबाईल गेम्स असलेल्या अ‍ॅपसह पेमेंट तसेच अन्य अ‍ॅपचा समावेश आहे. तसेच काही भारतीय अ‍ॅपमध्येसुद्धा चीनची मोठी गुंतवणूक आहे.
आणखी काही चिनी अँप रडारवर
दरम्यान, सोमवारी कारवाई केलेल्या ५९ अ‍ॅपमधून भारतातील माहिती अन्य देशांमध्ये पोहोचवण्यात येत होती, असा ठपका केंद्र सरकारने ठेवला आहे. तसेच ही बाब देशासाठी योग्य नसल्याचे सरकारने म्हटले आहे. दरम्यान, यापुढेही कुठले अ‍ॅप देशहिताच्या विरोधात काम करत असल्याचे दिसून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सरकारने सांगितले आहे. गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्षात भारताच्या २० जवानांना आलेल्या वीरमरणानंतर सीमेवर तणावाचे वातावरण असून, देशात चीनविरोधात संतापाची भावना आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने बंदी घातलेल्या ५९ अ‍ॅपची यादी काल प्रसारित केली होती. सरकार अजून काही चिनी अ‍ॅपवर कारवाई होऊ शकते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -