Corona Guidelines for Childrens: ५ वर्षांच्या मुलांना मास्कची सक्ती नाही! एंटीव्हायरल वापरासाठी केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जाहीर

पाच वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयांच्या मुलांसाठी मास्क घालण्याची शिफारस केली नाही. तर ६ ते ११ वर्षे वयोगटातील मुले आई-वडिलांच्या प्रत्यक्ष देखरेखीत सुरक्षितपणे मास्क घालू शकतात, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले.

Government recommends no masks for kids aged below 5 years in new Covid guidelines
Corona Guidelines for Childrens: ५ वर्षांच्या मुलांना मास्कची सक्ती नाही! एंटीव्हायरल वापरासाठी केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जाहीर

देशात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. लहान मुलेही कोरोनाचा शिकार होत आहेत. अशात केंद्र सरकारने लहान मुलांना मास्क घालण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात सरकारने काल, गुरुवारी गाईडलाईन्स जारी केली आहे. यामध्ये पाच वर्षांपर्यंतच्या लहान मुलांचा मास्क घालण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. याप्रमाणे १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी अँटीव्हायरल किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीचा वापर करण्याची शिफारस केली जात नाही. जरी कोरोनाची गंभीरता काही काही असो. अशावेळी जरी स्टेराईडचा उपयोग केला तरी ते १० ते १४ दिवसांपर्यंत डायल्यूट (पातळ) केले पाहिजे.

लहान मुले आणि किशोरवयीनसाठी कोरोना व्यवस्थापनासाठी सुधारित सर्वसमावेश गाईडलाईनमध्ये आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, पाच वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयांच्या मुलांसाठी मास्क घालण्याची शिफारस केली नाही. तर ६ ते ११ वर्षे वयोगटातील मुले आई-वडिलांच्या प्रत्यक्ष देखरेखीत सुरक्षितपणे मास्क घालू शकतात. १२ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या मुलांना प्रौढाप्रमाणे मास्क घातला पाहिजे.

दरम्यान कोरोनासह ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे विशेष तज्ज्ञांनी गाईडलाईन्सचा आढावा घेतला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, विविध देशांमधील आकड्यांनुसार ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्यानंतर गंभीरता कमी आहे. सध्या सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण अजूनही तिसऱ्या लाटचाा कहर थांबला नाही आहे. देशात सध्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. काल, गुरुवारी ३ लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद देशात झाली.


हेही वाचा – अँटिबायोटिक औषधांचा विषाणूंवर कोणताही प्रभाव नाही ; संशोधनातून आले समोर