घरअर्थसंकल्प २०२२Union Budget 2022: यूपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MSPबाबत सरकारकडून आश्वासनं, कोणत्या पिकांना होणार...

Union Budget 2022: यूपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MSPबाबत सरकारकडून आश्वासनं, कोणत्या पिकांना होणार फायदा?

Subscribe

उत्तर प्रदेश आणि पंजाबसहित देशात पाच राज्यांच्या विधानसभेची निवडणूक होत आहे. याचदरम्यान केंद्र सरकारकडून शेतकरी बांधवांबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेला MSP त्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केलीय.

कोणत्या पिकांना होणार फायदा?

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात एमएसपी म्हणजेच किमान आधारभूत किंमतीची घोषणा करण्यात आली आहे. यूपीसह पाच राज्यांच्या निवडणुकीने एमएसपीला अधिक महत्त्व दिले आहेत. कारण यूपीमध्ये आपली सत्ता वाचवण्यासाठी भाजपवर दबाव आहे. अशा परिस्थितीत एकूण २३ पिकांना एमएसपीचा फायदा होणार आहे.

- Advertisement -

या २३ पिकांमध्ये भात, गहू, बाजरी, मका, ज्वारी, नाचणी यांचा समावेश आहे. याशिवाय, हरभरा, तूर, मूग, उडीद आणि मसूर या कडधान्य पिकांवर आणि सोयाबीन, मोहरी, सूर्यफूल, तीळ, किंवा काळे तीळ आणि करडई या तेलबिया पिकांनाही एमएसपीबाबत निर्णय घेण्यात आला असून ऊस, कापूस, ताग आणि नारळावरही एमएसपी दिला जातो.

काय आहे एमएसपी ?

एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत ही एक हमीभावाची प्रणाली आहे. हमीभाव प्रत्येक पिकांवर वेगवेगळ्या पद्धतीने लागू होतो. शेतकऱ्याच्या पिकाला बाजारात भाव कमी किंवा अधिक घसरण झाली असेल. तर केंद्र सरकारने ठरवलेल्या हमीभावाने शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला जातो. अर्थसंकल्पात केंद्र सरकारने नवीन आर्थिक वर्षात १६३ लाख शेतकऱ्यांकडून १ हजार २०८ मेट्रिक टन गहू आणि धान्य खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच अर्थमंत्र्यांनी आज शेतकऱ्यांच्या खात्यात २.३७ लाख कोटी रुपये पाठवण्याची घोषणा केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Budget 2022 : डोंगर पोखरून उंदीरही निघाला नाही, अर्थसंकल्पावर छगन भुजबळांची खोचक टीका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -