घरताज्या घडामोडीCorona New Variant: कोरोनाच्या C.1.2 नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची अद्याप भारतात नोंद नाही

Corona New Variant: कोरोनाच्या C.1.2 नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची अद्याप भारतात नोंद नाही

Subscribe

देशासह जगभरात आता कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा कहर सुरू आहे. यादरम्यान कोरोनाचा आणखीन एक नवा व्हेरियंटची दहशत पसरली आहे. C.1.2 असं या नव्या व्हेरियंट नाव आहे. पण सध्या भारतामध्ये C.1.2 व्हेरियंट एकही रुग्ण आढळला नाही आहे. सरकारी सुत्रांनुसार बुधवारी सांगितले की, भारतात अजूनपर्यंत नवा कोरोना व्हेरियंट C.1.2 चे कोणतेही प्रकरण समोर आले नाही आहे. वृत्तसंस्थे पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत.

दक्षिण आफ्रिकेमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिजीज (एनआयसीडी) आणि क्वाजुलु-नेटल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेंसिंग प्लेटफॉर्मचे (केआरआईयएसपी) वैज्ञानिक म्हणाले की, SARS-CoV-2c नवा व्हेरियंट अधिक संसर्गजन्य असू शकतो आणि सध्या सीओव्हीआयडी-१९ लसीच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुरक्षेला हा व्हेरियंट मात देऊ शकतो. याच अर्थ असा की, लसीचा परिणाम हा नव्या व्हेरियंटवर होत नाही.

- Advertisement -

वैज्ञानिकांनी सांगितले की, हा नवा व्हेरियंट C.1.2 मे महिन्यात आढळला होता. तेव्हापासून १३ ऑगस्टपर्यंत कोरोनाचा हा व्हेरियंट चीन, कांगो, मॉरीशस, इंग्लंड, न्युझीलँड, पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान आढळलेला C.1 व्हेरियंटच्या तुलनेत C.1.2 व्हेरियंटमध्ये अधिक बदल झाले आहेत. यामुळे हा व्हेरियंटची नोंद ‘व्हेरियंट ऑफ इंटेरेस्ट’ श्रेणीमध्ये केली आहे.


हेही वाचा – कोरोनाच्या आणखी एका व्हेरियंटने वाढवली जगाची डोकेदुखी, लस ठरतेय निष्प्रभ-WHO

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -