घरCORONA UPDATEकोरोनाच्या काळात तृतीयपंथीयांच्या मदतीला केंद्र सरकार, मिळणार १५०० रूपयांची मदत

कोरोनाच्या काळात तृतीयपंथीयांच्या मदतीला केंद्र सरकार, मिळणार १५०० रूपयांची मदत

Subscribe

ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी 8882133897 हेल्पलाइन सुरू

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका समाजातील प्रत्येक छोट्या- छोट्या घटकांना बसत आहे. उद्योग-धंदे बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यात तृतीयपंथींयांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे अन्न आणि आरोग्यासारख्या मूलभूत गरजा भागवणेही अनेक तृतीय पंथी नागरिकांना कठीण जात आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत असे होऊ नये म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या संकंटकाळात तृतीयपंथीयांना १५०० रुपयांची आर्थिक मदत करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग पुढे आला आहे. या निर्णयामुळे कोरोनाच्या काळात तृतीयपंथीयांची होणारी उपासमारी टाळली जाईल.

तृतीयपंथी व्यक्तींसाठी निर्वाह भत्ता

कोरोनामुळे तृतीयपंथी समुदायातील सदस्यांनी समुदायाचे होणारे हाल पाहता सरकारकडे मदत आणि पाठींब्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर आता सामाजिक न्या आणि अधिकार मंत्रालयाने तृतीयपंथींच्या कल्याणसाठी नोडल मंत्रालयने प्रत्येक तृतीयपंथी व्यक्तीला त्यांचा मूलभूत गरजा भागविण्यासाठी तातडीची मदत म्हणून १५०० रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. ही आर्थिक मदत तृतीय पंथी समुदायाला त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत करेल. तृतीय पंथी व्यक्तींसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्था आणि समुदाय-आधारित संस्था (सीबीओ) यांनाही याबाबत जनजागृती करण्यास आवाहन केले गेले आहे.

- Advertisement -

अर्ज कसा करावा

कोणत्याही तृतीयपंथी व्यक्तीला सीबीओ https://forms.gle/H3BcREPCy3nG6TpH7रुपात मूलभूत तपशील, आधार आणि बँक खाते क्रमांक दिल्यानंतर आर्थिक मदतीसाठी अर्ज भरता येणार आहे. सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालयाअंतर्गत असलेली स्वायत्त संस्था राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संस्थेच्या वेबसाईटवर हा फॉर्म उपलब्ध आहे. अधिकाधिक तृतीयपंथी व्यक्तींपर्यंत यासंदर्भातील माहिती पोहचवण्यासाठी हे फॉर्म स्वयंसेवी संस्था आणि सीबीओच्या मदतीने सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहे. सामाजिक मंत्रालयाने गेल्या वर्षीही लॉकडाऊनदरम्यान तृतीय पंथी व्यक्तींना अशाचप्रकारे आर्थिक मदत आणि रेशन किटदेखील पुरविले होतेय यासाठी एकूण ९८.५० लाख रुपये खर्च करण्यात आले असून देशभरातील सुमारे ७००० तृतीयपंथी लोकांना याचा फायदा झाला.

मानसिक आरोग्यासाठी हेल्पलाईन नंबर

मानसिक आरोग्याच्या समस्या असलेली लोक आसपासच्या परिस्थितीमुळे मदतीसाठी विचारणा करण्यास संकोच करतात. त्यामुळे मानसिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य सेवेसाठी केंद्र सरकारने तृतीयपंथी व्यक्तींसाठी एक विनामूल्य हेल्पलाईन सुरु केली आहे. 8882133897 या हेल्पलाईनच्या माध्यमातून तृतीयपंथी व्यक्ती तज्ज्ञांशी बातचीत करु शकतात. ही हेल्पलाईन सोमवारी ते शनिवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत दुपारी 3 ते 5 दरम्यान काम करेल. या हेल्पलाइनवर व्यावसायिक मानसशास्त्रज्ञांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा प्रदान केल्या जातील.

- Advertisement -

तृतीयपंथींचे लसीकरण

कोरोनाविरोधी लसीकरण केंद्रांवर तृतीयपंथी व्यक्तींशी कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मंत्रालयाने सर्व राज्यांच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिले आहे. त्यांनी लसीकरण प्रक्रियेची माहिती व जागरूक करण्यासाठी विविध भाषांमध्ये तृतीयपंथी समुदायासाठी विशेषतः जनजागृती मोहीम राबविण्याची विनंती केली आहे. हरियाणा आणि आसाम या राज्यांप्रमाणेच तृतीयपंथी व्यक्तींच्या लसीकरणासाठी स्वतंत्र मोबाइल लसीकरण केंद्रे किंवा बूथ आयोजित करण्याची विनंती राज्यांना करण्यात आली आहे.


black fungus स्पर्शाने पसरत नाही, विविध रंगात वर्गीकरण करणे चुकीचे- आरोग्य मंत्रालय


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -