घरदेश-विदेशलसीकरणासाठी तुम्ही चुकीच्या Cowin अ‍ॅपवर तर रजिस्ट्रेशन करत नाही ना?

लसीकरणासाठी तुम्ही चुकीच्या Cowin अ‍ॅपवर तर रजिस्ट्रेशन करत नाही ना?

Subscribe

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारता सुरु आहे. १ मे पासून देशात १८ ते ४४ वयोगटाचं देखील लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करावं लागत आहे. यासाठी केंद्राने Cowin अ‍ॅप तयार केला आहे. परंतु यासारखे अनेक अ‍ॅप तयार करण्यात आले आहेत. ज्यावरुन लोकांची माहिती गोळा केली जात आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने इशारा दिला आहे. CERT-In ने लोकांना सावध केलं असून पाच फाईल्स डाऊनलोड करु नका असं सांगितलं आहे.

पाच APK फाईल्स डाउनलोड न करण्याचा सल्ला

CERT-In नुसार, या एसएमएसद्वारे वापरकर्त्यांना बनावट अ‍ॅपद्वारे कोरोना लसीकरणासाठी नोंदणीची ऑफर दिली जात आहे. प्रत्येक मॅसेज वेगळा असू शकतो, परंतु ते Android फोन वापरकर्त्यांना नोंदणी अ‍ॅप्सच्या APK फाइल्स डाऊनलोड आणि इनस्टॉल करण्यास सांगतात. अ‍ॅपची लिंक देखील मॅसेजद्वारे पाठवली जाते. Covid-19.apk, Vccin-Apply.apk, Cov-Regis.apk, Vaci__Regis.apk, आणि MyVaccin_v2.apk या APK फाईल्स आहेत.

- Advertisement -

इनस्टॉल केल्यानंतर आपल्या मित्रांनाही एसएमएस 

CERT-In ला असं आढळून आलं आहे की ज्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप्स इनस्टॉल केले जात आहेत त्यांच्या संपर्क यादीतील लोकांना डाऊनलोड करण्यासाठी एसएमएस जात आहे. नियामकाने लोकांना या अ‍ॅपने मागितलेली मान्यता मंजूर करण्यापासून इशारा दिला आहे. हे बनावट अॅप्स वापरकर्त्यांचे पासवर्ड आणि इतर वैयक्तिक माहिती चोरू शकतात.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -