वाहनधारकांना दिलासा; नितीन गडकरींनी घेतला ‘हा’ निर्णय

लॉकडाउनमुळे मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यात अडचणी येत असल्याने निर्णय घेतला आहे.

If you send a photo of a car parked in the wrong place, you will get Rs 500, said Nitin Gadkari

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनधारकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना ३० सप्टेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे. नितीन गडकरी यांच्या या निर्णयामुळे देशातील वाहनधारकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. वाहनधारकांना लॉकडाऊनमुळे मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यात अडचणी येत असल्याने याआधी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान, ही मुदतवाढ आता ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे.

तथापि, या निर्णयासंदर्भातील आदेश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. फिटनेस, परमिट (सर्व प्रकारचे), PUC, वाहन परवाना, नोंदणी किंवा विमा इतर कोणतीही संबंधित कागदपत्रे ज्यांची वैधता संपलेली आहे. देशव्यापी लॉकडाऊनमुळे त्यांचं नूतनीकरण करण्यात अडचणी येत आहेत. अशा वाहनधारकांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्यांचं वाहन परवाना, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, PUCसारख्या कागदपत्रांची मुदत १ फेब्रुवारी ते ३० जूनच्या कालावधीत संपत आहे, त्यांच्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता वाहनधारकांना ३० सप्टेंबर २०२० पर्यंत नूतनीकरण करता येणार आहे.


हेही वाचा – आज भारत-चीन सैन्यात मेजर जनरल पातळीवर चर्चा