घरदेश-विदेशGrammy Awards 2024 : Grammy Awards वर भारतीयांचे वर्चस्व; शंकर महादेवन, झाकिर...

Grammy Awards 2024 : Grammy Awards वर भारतीयांचे वर्चस्व; शंकर महादेवन, झाकिर हुसेन ‘ग्रॅमी’ने सन्मानित

Subscribe

मुंबई – संगीत क्षेत्रामधील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक ग्रॅमी पुरस्कार 2024 ची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसेन यांना ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामुळेच 66 वा ग्रॅमी पुरस्कार सोहोळा भारतासाठी खास ठरला आहे. शंकर महादेवन आणि झाकिर हुसेन यांच्या ‘शक्ती’ या बँडच्या ‘दिस मोमेंट’ या अल्बमला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा किताब मिळाला आहे. या अल्बममध्ये आठ गाणी आहेत. शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसेन यांच्यासह चार संगीतकारांनी हा पुरस्कार जिंकला आहे.

हेही वाचा – Khadse Vs Mahajan : ‘या’ कारणामुळे एकनाथ खडसेंच्या मालमत्तेचा होऊ शकतो लिलाव; गिरीश महाजनांची माहिती

- Advertisement -

ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रात दिला जाणारा सर्वात मोठा जागतिक पुरस्कार आहे. लॉस एंजेलिसमधील एरिना येथे हा पुरस्कार सोहळा रंगला. ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये तबलावादक झाकिर हुसेन यांनी इतिहास रचला आहे. झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. यासोबतच बासरी वादक राकेश चौरसिया यांनी दोन ग्रॅमी पुरस्कारही जिंकले आहेत. या यादीत भारतीय गायक शंकर महादेवन यांचे देखील नाव आहे. शंकर महादेवन यांना ‘पोश्तो’ गाण्यासाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.

- Advertisement -

संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी युनायटेड स्टेट्सच्या रेकॉर्डिंग अकादमीद्वारे कलाकारांना ग्रॅमी पुरस्कार दिले जातात. प्रसिद्ध विनोदी अभिनेता ट्रेव्हर नोआ याने सलग चौथ्यांदा ग्रॅमी पुरस्कार होस्ट केले. या सोहळ्यामध्ये गायक टेलर स्विफ्ट, ऑलिव्हिया रॉड्रिगो, मायली सायरस आणि लॅना डेल रे यांनी यावर्षी अनेक ग्रॅमी पुरस्कार जिंकले. ग्रॅमीमध्ये गायिका मायली सायरसने तिच्या कारकिर्दीतील पहिला ग्रॅमी जिंकला. सोलाना इमानी रोवेने या वर्षीच्या नामांकनांमध्ये वर्चस्व राखले.

पुरस्कार पत्नीला अर्पण

ग्रॅमी पुरस्कार स्वीकारताना शंकर महादेवन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. हा पुरस्कार मी माझ्या पत्नीला अर्पण करतो. माझ्या आतापर्यंतच्या संगीतप्रवासात तिची साथ खूपच मोलाची ठरली आहे. हे आमचे टीम वर्क आहे. सगळ्यांच्या सहकार्याशिवाय इतकी मोठी गोष्ट घडत नसते. आमच्या टीममध्ये सगळ्यांचे चांगले बॉण्डिंग होते. या पुरस्कारासाठी मी माझे मित्र, कुटुंब आणि देवाचे खूप खूप आभार मानतो. यासोबतच मला तमाम भारतीयांचे आभार मानायचे आहेत. त्यांचा पाठिंबा आणि आशीर्वाद हे माझ्या पाठीशी आहेत. मला आपल्या देशाचा गर्व आहे. ग्रॅमी पुरस्कार पटकावलेल्या सर्वांना शुभेच्छा देत मी त्यांचे अभिनंदन करतो.

भारतीय संगीतकार आणि ग्रॅमी पुरस्कार विजेता रिकी केज (Indian music composer and Grammy winner Ricky Kej) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संगीतकार आणि त्यांची कामगिरी याचे त्यांनी कौतुक केले. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी म्हटले आहे की, ‘शक्ती’नं ग्रॅमी जिंकलं. भारत आता सगळीकडून झळाळून उठत आहे त्याची चमक वाढत आहे. या सगळ्या विजेत्यांना खूप साऱ्या शुभेच्छा…अशा शब्दांत रिकीनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर झाकिर हुसेन यांनी टीम आणि देशातील चाहत्यांचे आभार मानले आहे. या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. आताच्या क्षणी या सगळ्यांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत उस्तादजींनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – Maharashtra Congress : काँग्रेसचे 15 आमदार महायुतीत जाणार? मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -